Saif Ali Khan: कधी व्हिलन होऊन तर कधी हिरो होऊन केलं प्रेक्षकांचे मनोरंजन; जाणून घ्या सैफ अली खानच्या चित्रपटांबद्दल...

सैफनं काही चित्रपटांमध्ये व्हिलनची भूमिका साकारली तर काही चित्रपटांमध्ये हिरोची भूमिका साकारली.

Saif Ali Khan

1/9
अभिनेता सैफ अली खान हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असतो.
2/9
सैफनं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अनेकांनी त्याच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.
3/9
सैफनं काही चित्रपटांमध्ये व्हिलनची भूमिका साकारली तर काही चित्रपटांमध्ये हिरोची भूमिका साकारली.
4/9
सैफनं काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या आदिपुरुष या चित्रपटामध्ये लंकेश ही भूमिका साकारली. या चित्रपटामधील सैफच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले.
5/9
2006 मध्ये रिलीज झालेल्या ओंकारा या चित्रपटामध्ये सैफ अली खाननं ईश्वर लंगडा त्यागी ही भूमिका साकारली होती. या चित्रपटामधील त्याच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं होतं.
6/9
तान्हाजी: द अनसंग वॉरियर या चित्रपटामध्ये देखील उदयभान सिंह राठोड ही भूमिका साकारली. हा चित्रपट 2020 मध्ये रिलीज झाला होता.
7/9
कॉकटेल, लव्ह आज कल, ता रा रम पम,हम तूम या चित्रपटांमधून सैफ प्रेक्षकांच्या भेटीस आला.
8/9
सैफचा आणि अमृता सिंहनं 1991 मध्ये लग्न केले. त्यानंतर 2004 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. सैफचा आणि अमृता यांना सारा आणि इब्राहीम ही दोन मुलं आहेत.
9/9
सैफने अभिनेत्री करिना कपूरसोबत 2012 साली लग्न केले. 20 डिसेंबर 2016 रोजी सैफ आणि करिनाला मुलगा झाला त्याचं नाव त्यांनी तैमुर असे ठेवले. त्यानंतर सैफला दुसरा मुलगा झाला त्यांच नावं त्यांनी जहांगिर असं ठेवलं आहे.
Sponsored Links by Taboola