कसा आहे आलिया आणि रणवीर यांचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ ? नेटकरी म्हणातात...
काही नेटकऱ्यांनी रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाचा रिव्ह्यू सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Rocky Aur Rani Ki Prem Kahaani
1/8
चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahaani) हा चित्रपट आज (28 जुलै) थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
2/8
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहाबाहेर गर्दी केली.
3/8
हे. काही नेटकऱ्यांनी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाचा रिव्ह्यू सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट नेटकऱ्यांना कसा वाटला? याबाबत जाणून घेऊयात ...
4/8
रणवीर सिंह आणि आलिया भट्टा यांचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट काही नेटकऱ्यांना आवडला आहे.
5/8
एका नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं,' या चित्रपटात सर्व इमोशन्स आहेत. '
6/8
नेटकऱ्यांनी रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटामधील रणवीर आणि आलियाच्या केमिस्ट्रीचे कौतुक केले आहे.
7/8
दुसऱ्या युझरनं लिहिलं, 'मला रणवीरचा अभिनय आवडला आहे. मी आलियासाठी हा चित्रपट बघायला आले होते,पण रणवीरनं माझं लक्ष वेधून घेतलं. खूप छान चित्रपट आहे.'
8/8
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामध्ये अभिनेता रणवीर सिंह, अभिनेत्री आलिया भट्ट, जया बच्चन, धर्मेंद्र, क्षिती जोग, शबाना आझमी हे कलाकार प्रमुख भूमिका साकारली आहे.
Published at : 28 Jul 2023 06:29 PM (IST)