दिलजित किंवा हनी सिंह नाही, 'हा' 67 वर्षीय पंजाबी गायक आहे सर्वात श्रीमंत; कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक
संगीत मनोरंजनाचा एक उत्तम मार्ग आहे. काहींना जुनी गाणी आवडतात, काहींना क्लासिकल, काहीं पॉप म्युझिक, रोमँटिक गाणी आवडतात. काही जण बॉलिवूडची गाणी गुणगुणतात, काही इंग्रजी तर काही पंजाबी. पंजाबी गाण्यांचाही मोठा चाहतावर्ग आहे. इतकंच नाही, तर पंजाबी गाण्यांप्रमाणे पंजाबी गायकांचीही खूप क्रेझ आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्याच्या लोकप्रिय पंजाबी गायकांच्या यादीत एपी ढिल्लन याचं नाव सामील आहे. या कॅनडा स्थित पंजाबी गायक एपी धिल्लनची गाणीही खूप गाजली. त्याच्या आवाजाने तरुणाईला वेड लावलं आहे. रिपोर्टनुसार, एपी ढिल्लनची एकूण संपत्ती 81 कोटी रुपये आहे.
पंजाबी गायकांच्या यादीत हार्डी संधूचं नावही आघाडीवर आहे. गायक होण्यापूर्वी हार्डी संधू चांगला क्रिकेटर होता. फार कमी लोकांना माहीत आहे की, 2004 च्या अंडर-19 क्रिकेट विश्वचषकात तो भारतीय संघाचा भाग होता. नंतर त्याने संगीत क्षेत्रातील करियरला सुरुवात केली आणि 'बिजली बिजली' या गाण्याने त्याला ओळख मिळाली. रिपोर्ट्सनुसार, हार्डी संधूची एकूण संपत्ती सुमारे 21 मिलियन डॉलर म्हणजेच 174 कोटी रुपये आहे.
दिलजीत दोसांझचे भारतीय जागतिक नकाशावर स्थान मिळवून दिलं आहे. 2024 मधील त्याची वर्ल्ड टूर खूप यशस्वी झाली. दिलजितच्या 'मझाइल' आणि 'ब्राउन मुंडे' या गाण्यांनी चाहत्यांच्या मानत स्थान निर्माण केलं. रिपोर्टनुसार, दिलजित दोसांझची नेटवर्थ 172 कोटी रुपये आहे.
भारतातील सर्वात श्रीमंत पंजाबी गायकांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर शैरी मान आहे. यार अनमुले आणि चंदीगड वाले यांसारख्या हिट गाण्यांनी त्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली. गायक शैरी मान याची एकूण संपत्ती 643 कोटी रुपये आहे.
गायक गुरदास मान यांचे जगभरातील लाखो चाहते आहेत. दूरदर्शनच्या 'दिल दा ममला है' या गाण्याने गुरदास मान यांनी करिअरची सुरुवात केली. 'वाह नी जवानी', 'चुगलियां', 'पीरह प्रहों' त्यांची ही गाणी खूप प्रसिद्ध आहेत. रिपोर्ट्सनुसार, गुरदास मान यांची एकूण संपत्ती 450 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. भारतातील सर्वात श्रीमंत पंजाबी गायकांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.