Rashmika Mandanna : 'डीपफेक' व्हिडीओ प्रकरणानंतर रश्मिका मंदानाची पहिली झलक समोर
अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या 'डीपफेक व्हिडीओ प्रकरण' आणि तिच्या आगामी 'अॅनिमल' (Animal) या सिनेमामुळे चर्चेत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरश्मिकाचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ती डीपफेक ड्रेसमध्ये लिफ्टमध्ये शिरताना दिसली.
रश्मिकाचा हा व्हिडीओ मॉर्फ आणि एडिट केलेला असल्याचं समोर आलं.
'डीपफेक' व्हिडीओ प्रकरणानंतर रश्मिका मंदानाची पहिली झलक अखेर समोर आली आहे.
रश्मिकाचा 'अॅनिमल' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.
'अॅनिमल' सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान रश्मिकाने सुंदर साडी नेसली होती. त्यावेळी रणबीर कपूरदेखील तिच्यासोबत उपस्थित होता.
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि रश्मिका मंदानाची जोडी पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
रणबीर आणि रश्मिकाचा 'अॅनिमल' हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
रणबीर-रश्मिकाच्या अॅनिमल सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा संदीप वांगा रेड्डीने सांभाळली आहे.
रणबीर-रश्मिकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.