PHOTO: रश्मिका मंदनाच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा, ‘गुड बाय’मधून करणार हिंदीत पदार्पण!
‘नॅशनल क्रश’ म्हणून प्रसिद्ध असणारी अभिनेत्री रश्मिका मंदना लवकरच हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण करणार आहे. रश्मिका सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'गुड बाय' या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करताना दिसणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान, अभिनेत्रीने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
या फोटोंमध्ये अभिनेत्रीचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये अभिनेत्री डेनिम ब्रॅलेट आणि जॅकेटमध्ये दिसत आहे. तिची ही शैली चाहत्यांना खूप आवडली आहे.
या पोस्टनंतर काही वेळातच लोकांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, 'तू खूप सुंदर दिसत आहेस.'
आणखी एका यूजरने लिहिले की, 'तू खूप सुंदर दिसते आहेस. मी तुमचा खूप मोठा चाहता आहे.’ याशिवाय अनेक यूजर्स या पोस्टवर फायर इमोजी शेअर करत आहेत.
याशिवाय अनेक यूजर्स या पोस्टवर फायर इमोजी शेअर करत आहेत.
रश्मिका आणि अमिताभ व्यतिरिक्त नीना गुप्ता, सुनील ग्रोवर, आशिष विद्यार्थी आणि पावेल गुलाटी हे कलाकार देखील ‘गुड बाय’मध्ये दिसणार आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे. रश्मिका या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (Photo : @rashmika_mandanna/IG)