South Films On OTT: यशोदा ते रंगस्थलम ; वीकेंडला घरबसल्या ओटीटीवर पाहा हे साऊथ चित्रपट
South Films On OTT: वीकेंडला तुम्ही हे साऊथ चित्रपट घरबसल्या ओटीटीवर पाहू शकता.
South Films On OTT
1/8
अनेकांना साऊथ चित्रपट बघण्याची आवड असते. या वीकेंडला तुम्ही हे साऊथ चित्रपट घरबसल्या ओटीटीवर पाहू शकता.
2/8
लव्ह टुडे हा एक तमिळ रोमँटिक-कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात प्रदीप रंगनाथन, इवाना, रवीना रवी, योगी बाबू, सत्यराज आणि राधिका शरथकुमार या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट तुम्ही Netflix वर पाहू शकता.
3/8
कडैसी विवसयी हा एक तमिळ चित्रपट आहे. या चित्रपटात विजय सेतुपती आणि योग बाबू मुख्य भूमिकेत आहेत. तुम्ही हा चित्रपट सोनी लिव्ह अॅपवर पाहू शकता.
4/8
यशोदा हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झालेसा तमिळ अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात सामंथा रुथ प्रभू मुख्य भूमिकेत आहे. तुम्ही प्राइम व्हिडीओवर हा चित्रपट पाहू शकता.
5/8
भूतकलम हा हॉरर चित्रपट आहे. हा चित्रपट तुम्ही सोनी लिव्हवर पाहू शकता.
6/8
दुल्कर सलमान आणि मृणाल ठाकूर यांचा 'सीता रामम' चित्रपट 5 ऑगस्ट 2022 रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्राइम व्हिडिओ आणि डिस्ने प्लस हॉटस्टारवर उपलब्ध आहे.
7/8
'RRR' 24 मार्च 2022 रोजी रिलीज झाला. या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत होती. हा चित्रपट नेटफ्लिक्स आणि हॉटस्टारवर तुम्ही पाहू शकता.
8/8
रंगस्थलम हा चित्रपट 30 मार्च 2018 रोजी रिलीज झाला होता. आता हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर तुम्ही पाहू शकता.
Published at : 15 Sep 2023 04:49 PM (IST)