Pushpa Mistakes: महत्त्वाच्या सीनमध्येच मोठी गडबड, ‘पुष्पा’तील ‘या’ चुका तुमच्या लक्षात आल्या का?
अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) ‘पुष्पा’ (Pushpa) चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे, तरीही हा चित्रपट ट्रेंडमध्ये आहे. अल्लू अर्जुनपासून ते चित्रपटातील प्रत्येक कलाकारावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पण, चित्रपट बनवताना निर्मात्यांनी काही चुका देखील केल्या आहेत. ज्या सीनवर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या, त्याच सीनमध्ये निर्मात्यांनी गडबड केली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपहिली चूक पुष्पाच्या जिवलग मित्राकडून झाली आहे. व्हॅनचे गेट उघडू न शकलेला केशव दुसऱ्याच दिवशी लाल व्हॅन विमानाप्रमाणे उडवत होता. या संकल्पनेतच मेकर्सची चूक होती.
‘पुष्पा’ चित्रपटात एक रात्रीचे दृश्य दाखवण्यात आले आहे. पण, रात्रीच्या अंधारात बाहेर पडणाऱ्या लोकांच्या मागे हा सूर्यप्रकाश कुठून दिसतो.
पुढची चूक चित्रपटाच्या त्या दृश्यात घडली, जेव्हा अल्लू अर्जुन खिशात पैसे ठेवतो आणि ती नोट बाहेर पडताना दिसते. पण, कॅमेऱ्याच्या दुसर्या अँगलने त्या दृश्याकडे पाहिले, तर पैसे त्याच्या खिशातच दिसतात.
जर, तुम्हाला पुष्पाच्या बालपणीचा सीन आठवत असेल तर, एका सीनमध्ये पुष्पाची आई त्याला पकडण्यासाठी धावत आहे. या सीनच्या सुरुवातीला एक सायकल दिसते, पण पुढच्या सीनमध्ये अचानक ती सायकल गायब होते.
पोलीस अधिकाऱ्याला दिलेल्या लाचेची रक्कम चित्रपटात अनेक वेळा मोजण्यात आली होती. या दृश्यात सरकारने बंदी घातलेल्या एक हजाराच्या जुन्या नोटा दिसत आहेत. पण, नीट पाहिल्यास लक्षात येईल की, हजार रुपयांच्या जुन्या नोटेवर तळाशी एक नंबर आहे. मात्र, बंद झालेल्या जुन्या हजाराच्या नोटांवर त्या ठिकाणी कोणताही नंबर नव्हता.