Project K Release Date : 'प्रोजेक्ट के' कधी होणार रिलीज?
अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एका फॅशन शोदरम्यानचा रॅम्पवर चालतानाचा थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्यांनी काळ्या रंगाचा डिझायनर कुर्ता परिधान केलेला दिसत आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफोटो शेअर करत त्यांनी लिहिलं आहे, माझ्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी तुम्ही केलेल्या प्रार्थनेसाठी आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद... आता माझी तब्येत ठीक असून लवकरच याच जोशात मी पुन्हा रॅम्पवर येईन, अशी आशा आहे.
अमिताभ बच्चन यांना 'प्रोजेक्ट के' (Project K) या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत झाली.
अमिताभ बच्चन यांचा 'प्रोजेक्ट के' हा सिनेमा 12 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
तगडी स्टार कास्ट असलेल्या या सिनेमाची सिनेप्रेमींना चांगलीच उत्सुकता आहे. प्रभास या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे
प्रभास सोबतच दीपिका सुद्धा 'प्रोजेक्ट के' मध्ये झळकणार आहे
सिनेमा 12 जानेवारी 2024 रोजी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. दिशा पटानी सुद्धा या सिनेमाचा भाग असणार आहे
काही वर्षांपूर्वी 'TE3N' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ यांच्या बरगड्यांना गंभीर इजा झाली होती.
'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाच्या शूटिंगदम्यान अमिताभ यांच्या पायाची नस कापली गेली होती.
'मेजर साब' आणि 'पीकू' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ यांना दुखापत झाली होती.
तसेच 'कुली' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानदेखील त्यांना गंभीर दुखापत झाली होती.
मात्र आता अमिताभ यांच्या आगामी सिनेमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे