PHOTO | आलिशान घर, लक्झरी गाड्यांची मालकीण; कमाईत पती निकपेक्षा प्रियांका वरचढ!

priyanka chopra

1/8
प्रियांका चोप्राने 2003 मध्ये हीरो चित्रपटातून आपल्या सिने कारकीर्दीची सुरुवात केली. या सिनेमात ती प्रमुख नव्हे तर सपोर्टिंग भूमिकेत होते. या इंडस्ट्रीत आज तिने 18 वर्षे पूर्ण केली आहेत आणि या 18 वर्षात तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. (Photo Credit- Instagram)
2/8
या 18 वर्षांत प्रियांका चोप्राने बॉलिवूड ते हॉलिवूड असा पल्ला गाठला हे. आजही ते अनेक बॉलिवूड प्रोजेक्टचा भाग आहे. कमाईच्या बाबतीत ती पती निक जोनसच्या पुढे आहे, हे वाचून निश्चितच कौतुक वाटेल (Photo Credit- Instagram)
3/8
होय, अब्जाधीश प्रियांका चोप्राकडे अनेक आलिशान घर, लक्झरी गाड्या आहेत. अनेक जाहिराती, चित्रपट तसंच इतर माध्यमातून ती कमाई करेते. प्रियांकाची कमाई निक जोनसपेक्षा फारच जास्त आहे. (Photo Credit- Instagram)
4/8
प्रियांका चोप्रा बॉलिवूड आणि हॉलिवूड या दोन्ही इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी तिला उत्पन्नाचे पर्याय खुले आहे. ती अनेक ब्रॅण्ड्सचा चेहरा आहे. जाहिराती, स्टेज शो आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करुनही ती पैसे कमावते. (Photo Credit- Instagram)
5/8
एखाद्या स्टेज शोसाठी प्रियांका चोप्रा पाच कोटी रुपये घेते. तर अनेक स्पॉन्सर पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यासाठी ती दोन कोटी रुपये घेते. प्रियांका अनेकदा अशा जाहिराती पोस्ट करत असते, यावरुन तिच्या कमाईचा अंदाज येऊ शकतो. (Photo Credit-Instagram)
6/8
तर प्रियांकाच्या संपत्तीबद्दल बोलायचं झाल्यास तिचे मुंबईपासून लॉस एन्जलिसमध्ये आलिशान बंगले आहेत. मुंबईत तिची अनेक दुकानं असून तिने भाड्याने दिल्याचंही समजतं. तर गोव्यातही तिचं आलिशान घर आहे, जिथे ती सुट्टीसाठी जाते. (Photo Credit- Instagram)
7/8
प्रियांकाकडे अनेक लक्झरी गाड्याही आहेत. तिच्याकडे रॉल्स रॉयल, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, पोर्श केयेन, कर्मा फिशर यांसारख्या महागड्या ब्रॅण्डच्या गाड्या असून त्यांच्या किंमती लाखो आणि कोट्यवधी आहे. (Photo Credit- Instagram)
8/8
प्रियांका आणि निक यांच्या एकूण कमाईबाबत बोलायचं झाल्यास ती यामध्ये निकपेक्षा वरचढ ठरते. प्रियांकाची वार्षिक कमाई 200 कोटी आहे तर पती निक वर्षभरात 175 कोटी रुपये कमावतो. (Photo Credit- Instagram)
Sponsored Links by Taboola