Photo : प्रियांका चोप्राची लेक येणार भारतात; बोर्डिंग पास शेअर करत अभिनेत्रीने दिली गुडन्यूज!
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा पहिल्यांदाच आपल्या लेकीसोबत भारतात येत आहे. बोर्डिंग पासचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिने यासंदर्भात माहिती दिली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलग्नानंतर प्रियांका नवऱ्यासोबत म्हणजेच निक जोनससह लॉस एंजेलिसमध्ये स्थायिक झाली. आता तीन वर्षानंतर प्रियांका आपल्या लेकीसोबत भारतात येत आहे.
प्रियांका पहिल्यांदा लेकीला घेऊन भारतात येणार असल्याने तिच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. सोशल मीडियावर बोर्डिंग पासचे फोटो शेअर करत प्रियांकाने चाहत्यांना माहिती दिली आहे.
तीन वर्षांनी भारतात येण्यासाठी प्रियांका खूप उत्सुक आहे. सोशल मीडियाद्वारे तिने ही आनंदाची बातमी सगळ्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
प्रियांकाने सोशल मीडियावर बोर्डिंग पासचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे,अखेर तीन वर्षांनी घरी जात आहे. कोरोनानंतर प्रियांका पहिल्यांदाच भारतात येत आहे.
प्रियांका आणि निक जोनस डिसेंबर 2018 साली लग्नबंधनात अडकले आहेत. तसेच प्रियांका आणि निकला मालती नावाची गोंडस मुलगी आहे.
प्रियांका परदेशात राहत असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
आयुष्यासंबंधीत प्रत्येक अपडेट ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतीच प्रियांका लेकीसोबत दिवाळीचा सण साजरा करताना दिसून आली.
सेलिब्रेशनचे फोटोदेखील तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
(Photo:@priyankachopra/IG)