PHOTO : वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी प्राची देसाईला मिळाली पहिली मालिका, फरहान अख्तरसोबत केलं बॉलिवूड पदार्पण!
एकता कपूरची प्रसिद्ध टीव्ही मालिका 'कसम से' मधून आपल्या करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री प्राची देसाई (Prachi Desai) ही बॉलिवूडच्या अशा सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांनी टेलिव्हिजनच्या जगापासून सुरुवात करून बॉलिवूडपर्यंत आपल्या मेहनतीने यश मिळवले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज (12 सप्टेंबर) अभिनेत्री प्राची देसाई आपला वाढदिवस साजरा करत आहे. प्राची देसाईचा जन्म 12 सप्टेंबर 1988 रोजी गुजरातमध्ये झाला.
सुरतमधून सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्राची पुढील शिक्षणासाठी पुण्यात आली. प्राचीला सुरुवातीपासूनच अभिनयाची गोडी होती. म्हणून पुण्यात आल्यावर तिने अभिनयात नशीब आजमावण्याचा विचार केला.
वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी प्राचीला एकता कपूरच्या 'कसम से' या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेत प्राची तिच्यापेक्षा 16 वर्षांनी मोठा असलेल्या राम कपूरसोबत मुख्य भूमिकेत झळकली होती.
2006 मध्ये प्रसारित झालेल्या 'कसम से' या मालिकेतील बानी कपूरच्या व्यक्तिरेखेतील प्राचीचा साधेपणा सर्वांनाच आवडला आणि ती घरोघरी लोकप्रिय झाली.
प्राची देसाईने केवळ दोन मालिकांमध्ये काम केले. यानंतर तिला 2008मध्ये फरहान अख्तरसोबत 'रॉक ऑन' या चित्रपटाची ऑफर मिळाली.
मालिका विश्वात मिळालेल्या यशानंतर’ प्राचीने मागे वळून पाहिले नाही. लवकरच प्राचीला बॉलिवूडमधूनही चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. यानंतर 2008 मध्ये 'रॉक ऑन' या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत झळकली होती. ‘रॉक ऑन’ चित्रपटात अभिनेता फरहान अख्तर नायक होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा आणि समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर प्राचीच्या हाताला एकापाठोपाठ एक अनेक चित्रपट लागले, ज्यात तिच्या दमदार अभिनयाचे खूप कौतुक झाले. (Photo : Prachi Desai/IG)