Prabhu Deva Birthday: जाणून घ्या भारताचा 'मायकल जॅक्सन' प्रभूदेवाबद्दल...

प्रभूदेवाचा (Prabhu Deva) आज 50 वा वाढदिवस आहे.तो भारताचा मायकल जॅक्सन कसा झाला? त्याबद्दल जाणून घेऊयात...

Continues below advertisement

Prabhu Deva Birthday

Continues below advertisement
1/8
भारतातील टॉप डान्सर आणि कोरिओग्राफर असणाऱ्या प्रभूदेवाचा (Prabhu Deva) आज 50 वा वाढदिवस आहे.
2/8
प्रभूदेवा हा केवळ डान्सर नाही तर अभिनेता आणि दिग्दर्शक देखील आहे.
3/8
प्रभूदेवानं त्याच्या नृत्यशैलीनं अनेकांची मनं जिंकली. प्रभूदेवा याची भारताचा मायकल जॅक्सन अशी ओळख आहे.
4/8
प्रभूदेवाचे वडील हे चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर होते. 1994 मध्ये प्रभूदेवनं 'निधू' चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता म्हणून एन्ट्री केली.
5/8
प्रभूदेवाने एकामागून एक अनेक चित्रपटात काम केले केले. प्रभूदेवाची लोकप्रियता त्यावेळी वाढत होती. त्यावेळी तो एका चित्रपटाचे 50 लाख रुपये मानधन घेत होता.
Continues below advertisement
6/8
'मुक्काला मुकाबला' (Muqabla) या गाण्यामध्ये प्रभूदेवाने डान्स केला. त्यानंतर त्याची लोकप्रियता आणखी वाढली.
7/8
प्रभूदेवाला त्यांच्या नृत्य क्षेत्रातील योगदानासाठी 2019 मध्ये पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
8/8
प्रभूदेवानं 1995 मध्ये रामलथसोबत (Ramlath) लग्न केले. रामलथ ही देखील नृत्यांगना आणि कोरिओग्राफर होती. लग्नानंतर प्रभूदेवा आणि रामलथ यांना तीन मुले झाली, मात्र मोठा मुलगा बसवराजू सुंदरम याचे 2008 मध्ये निधन झाले त्यानंतर 3 वर्षांनी प्रभूदेवा रामलथपासून विभक्त झाला.
Sponsored Links by Taboola