Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Photo: RRR चित्रपटाचे गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी नामांकन
केवळ भारतातच नव्हे तर जगभरात धुमाकूळ घातलेल्या एसएस राजामौली (SS Rajamouli) यांच्या आरआरआर (RRR) चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआरआरआर चित्रपटाचं मानाच्या गोल्डन ग्लोब (Golden Globes2023 Nomination ) पुरस्कारासाठी नामांकन झालं आहे.
बेस्ट फॉरेन फिल्म आणि बेस्ट ओरिजनल साँग या दोन प्रकारात आरआरआर चित्रपटाचे नामांकन झालं आहे.
हे नामांकन नॉन इंग्लिश चित्रपटाच्या प्रकारात झालं असून आरआरआर या चित्रपटासोबत इतर चार चित्रपट या पुरस्काराच्या शर्यतीत आहेत.
जगभरातल्या चित्रपटसृष्ठीमध्ये ग्लोल्डन ग्लोब पुरस्कार प्रतिष्ठेचा मानला जातोय. ऑस्करनंतर ग्लोल्डन ग्लोब पुरस्काराचं महत्त्व आहे.
त्यामुळे आरआरआर या चित्रपटाचे या पुरस्कारासाठी नामांकन झाल्याने राजामौलींवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
नॉन इंग्लिश चित्रपटांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत आरआरआर या चित्रपटाची इतर चार चित्रपटांशी स्पर्धा आहे.
त्यामध्ये ऑल क्वाएट ऑन वेस्टर्न फ्रंट (All Quiet on the Western Front), अर्जेंटिन 1985 (Argentina, 1985), क्लोज (Close), डिसिजन टू लिव्ह (Decision to Leave) या चित्रपटांचा समावेश आहे.
RRR या चित्रपटाची कथा ही बंडखोर कोमाराम भीम आणि अल्लुरी सीताराम राजू यांच्या वास्तविक जीवनावर आधारित असल्याचं सांगितलं जातंय.
हा चित्रपट केवळ भारतातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय ठरला आणि विक्रमी कमाई केली.