Pathaan Box Office Day 13: 'पठाण' च्या कमाईत घट; 13 व्या दिवसाचं कलेक्शन माहिती आहे का?
शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट रिलीज होऊन 13 दिवस झाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपठाण या चित्रपटानं एका आठवड्यात रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे.
आता पठाण या चित्रपटाच्या कमाईत घसरण होताना दिसत आहे.
रमेश बाला यांनी ट्विटरवर ट्वीट शेअर करुन पठाण चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती दिली आहे.
सोमवारी (6 फेब्रुवारी) पठाण या चित्रपटाच्या कमाईत घट झाली आहे.
सोमवारी पठाण चित्रपटानं भारतात 8 कोटींची कमाई केली आहे अशी माहिती रमेश बाला यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिली.
आता पठाण हा चित्रपट भारतात 450 कोटींचा टप्पा लवकरच पार करेल, असं म्हटलं जात आहे.
पठाण चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पादुकोण (Deepika Padukone), जॉन अब्राहम (John Abraham), आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया या कलाकरांनी मुख्य भूमिका साकारली आहे.
शाहरुखनं पठाण चित्रपटात एका रॉ एजंटची भूमिका साकारली आहे.
पठाण या चित्रपटातील शाहरुख आणि दीपिकाच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.