Parineeti Chopra: परिणीतीच्या वाढदिवसानिमित्त राघव चड्ढा यांनी शेअर केली खास पोस्ट; म्हणाले...

राघव चड्ढा यांनी सोशल मीडियावर खास फोटो शेअर करुन परिणीतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Parineeti Chopra Raghav Chadha

1/10
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्राचा (Parineeti Chopra) आज वाढदिवस आहे. यानिमित्त तिचे पती राघव चड्ढा (Raghav Chadha) यांनी तिला खास शुभेच्छा दिल्या आहेत.
2/10
राघव चड्ढा यांनी सोशल मीडियावर खास फोटो शेअर करुन परिणीतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राघव यांनी या फोटोला दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
3/10
राघव यांनी शेअर परिणीतीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "पारू, सुपरस्टारप्रमाणे तू माझे आयुष्य उजळून टाकतेस! तुझे एक स्मित हास्य माझे जीवन अद्भुत बनवू शकते. तू माझ्या आयुष्यात खूप आनंद आणला आहेस. या विशेष दिवशी, मला सर्वोत्कृष्ट स्त्रीचा वाढदिवस साजरा करायचा आहे, जी तू आहेस! हे फोटो आनंद, प्रेम आणि सर्वोत्तम क्षणांनी भरलेले आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा पत्नी"
4/10
राघव यांनी शेअर केलेल्या फोटोला परिणीतीनं कमेंट केली, "Back at you, you amazing amazing human"
5/10
परिणीती चोप्राचा जन्म 22 ऑक्टोबर 1988 रोजी अंबाला येथे झाला. परिणीती ही 35 वर्षांची झाली आहे. परिणीती ही लग्नानंतरचा पहिला वाढदिवस साजरा करत आहे.
6/10
अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून परिणीतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
7/10
उदयपूरमधील 'द लीला पॅलेस' येथे परिणीती आणि राघव यांचा शाही विवाहसोहळा पार पडला आहे.
8/10
हसी तो फसी, इश्कजादे, शुद्ध देसी रोमान्स, दावत-ए-इश्क यांसारख्या चित्रपटांमध्ये परिणीतीनं काम केलं.
9/10
परिणीती आणि राघव यांच्या विवाह सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.
10/10
परिणीती आणि राघव यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
Sponsored Links by Taboola