In Pics | या महिन्यात OTT प्लटफॉर्मवर स्ट्रीम होत आहेत हे चित्रपट आणि वेब सीरिज

Feature_Photo_3

1/7
गेल्या वर्षीपासून देशात कोरोनाच्या संक्रमणामुळे चित्रपटगृह बंद आहेत. त्याचा परिणाम म्हणजे लोकांनी OTT प्लॅटफॉर्मला पसंती दिली. गेल्या वर्षीपासून आतापर्यंत अनेक चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर रीलीज झाले आहेत. आता या महिन्यात OTT प्लॅटफॉर्मवर कोणते चित्रपट रीलीज होत आहेत किंवा स्ट्रीम होत आहेत ते पाहूया.
2/7
अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत असलेला 'द बिग बुल' हा चित्रपट 8 एप्रिलला डिज्नी प्लस हॉटस्टार वर रीलीज झाला आहे. या चित्रपटाची निर्मिती अजय देवगणने केली आहे.
3/7
टीव्हीवरचा प्रसिद्ध कलाकार पार्थ समथानची भूमिका असलेला 'मैं हिरो बोल रहा हू' ही वेब सीरिज 20 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
4/7
अनुप सोनी, पाओली डॅम आणि राहुल देव यांची भूमिका असलेला 'रात बाकी है' ही वेब सीरिज 18 एप्रिलला स्ट्रीम होणार आहे.
5/7
सत्यदीप मिश्रा, प्रियमणी आणि मृनाल दत्त यांची भूमिका असलेली 'हिज स्टोरी' जी 5 आणि ऑल्ट बालाजी वर 25 एप्रिलला रीलीज होणार आहे.
6/7
पंकज सारस्वतने दिग्दर्शित केलेला 'हॅलो चार्ली' हा एक अडव्हेन्चर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात आदर जैन, जॅकी श्रॉफ, श्लोका पंडित आणि राजपाल आहेत. हा चित्रपट अमेझॉन प्राईमवर 9 एप्रिलला रीलीज झाला आहे.
7/7
'द बिग डे: कलेक्शन 2' नेटफ्लिक्सवर 7 एप्रिलला रीलीज झाली आहे. यामध्ये भारतीय लग्नांच्या बद्दल दाखवण्यात आलं आहे.
Sponsored Links by Taboola