Nivedita Saraf: लग्नानंतर अशोक सराफ यांनी दिलेलं पहिलं गिफ्ट कोणतं? निवेदिता सराफ म्हणाल्या...
अशोक सराफ यांनी दिलेल्या गिफ्टबाबत निवेदिता सराफ (Nivedita Saraf) सांगितलं.
(Nivedita Saraf/instagram)
1/8
अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf) या त्यांच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये निवेदिता सराफ यांनी अशोक सराफ यांनी त्यांना दिलेल्या गिफ्टबाबत सांगितलं.
2/8
'लग्नानंतर अशोक मामांनी दिलेलं पहिलं गिफ्ट कोणतं?' असा प्रश्न एका मुलाखतीमध्ये निवेदिता यांना पुढे विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देत निवेदिता म्हणाल्या, 'लग्नाआधी दिलेलं गिफ्ट मला आठवत आहे, त्यांनी मला एक गोल्डचं ब्रेसलेट दिलं होतं. लग्नानंतर त्यांनी खूप गिफ्ट्स दिले. त्यांनी लग्नानंतर मला एक गोल्डचा सेट देखील दिला होता.'
3/8
फसलेल्या पहिल्या पदार्थाबाबत देखील निवेदिता सराफ यांना मुलाखतीमध्ये सांगितलं. त्या म्हणाल्या, 'माझा पहिला फसलेला पदार्थ हा तिळाचे लाडू हा आहे. दंगल झाली तर लोकांना दगड म्हणून फेकायला हे लाडू दे, असं अशोक मला तेव्हा मजेत म्हणाले होते.'
4/8
निवेदिता सराफ आणि अशोक सराफ यांनी 1990 मध्ये लग्नगाठ बांधली.
5/8
पहिल्यांदा प्रपोज कोणी केलं होतं? असा प्रश्न निवेदिता सराफ यांना मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देत त्या म्हणाल्या, 'मीच प्रपोज केलं होतं.'
6/8
निवेदिता सराफ यांनी बाळाचे बाप ब्रह्मचारी, तुझी माझी जमली जोडी, लपवा छपवी, आमच्या सरखे आम्हीच, बनवाबनवी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. निवेदिता सराफ या त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळवत असतात.
7/8
निवेदिता सराफ (Nivedita Saraf) या सध्या मी स्वरा आणि ते दोघं या नाटकामधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. तसेच त्या भाग्य दिले तू मला या मालिकेत देखील काम करत आहेत. निवेदिता यांना इन्स्टाग्रामवर 132K फॉलोवर्स आहेत. त्या सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असतात.
8/8
तर अशोक सराफ यांचा चाहता वर्ग मोठा आहे. अशोक सराफ हे त्यांच्या विनोदी शैलीनं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असतात.
Published at : 23 Jul 2023 05:55 PM (IST)