नेहा कक्कडने आपल्या लग्नात अनुष्का शर्मा आणि प्रियंका चोप्राला केलं कॉपी, विश्वास बसत नसेल तर फोटो पहा
आपल्या लग्नात नेहा कक्कडने अनुष्का शर्मा आणि प्रियंका चोप्राच्या स्टाईलला कॉपी केलं होतं. हे आम्ही नाही तर फोटोच सांगत आहेत. आणि फोटो कधी खोटं बोलत नाही. स्टाईल कॉपी केली असली तरी वधु म्हणून नेहा उठून दिसत होती. (Photo Credit - Social Media)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनेहाने प्रत्येक विधीला स्पेशल बनविण्यासाठी खास पोशाखांची निवड केली होती. यामध्ये ती खरोखर राजकन्या दिसत होती तर वर रोहनप्रीत राजकुमारासारखा शोभून दिसत होता. यात जाणवणारी गोष्ट म्हणजे नेहाची स्टाईल अनुष्का शर्मा आणि प्रियांका चोप्राच्या लग्नाच्या लूक प्रमाणे दिसत होती. (Photo Credit - Social Media)
आमच्या बोलण्यावर विश्वास बसत नसेल तर या फोटोंवर एक नजर टाका. एका बाजूला लाल लेंगामध्ये प्रियंका चोप्रा आणि दुसरीकडे नेहा कक्कड. हा ड्रेस काहीसा सारखाच आहे. पण, नेहानेही प्रियांकाच्या फोटोशूटची स्टाईल कॉपी केली आहे. (Photo Credit - Social Media)
आता जरा हा फोटो पहा. या फोटोंमध्ये नेहा कक्कड अनुष्का शर्माच्या स्टाईलमध्ये दिसली आहे. दोघींचा लेहेंगा एकसारखाच नाही तर फोटो क्लिक करण्याची स्टाईलदेखील सारखी आहे. (Photo Credit - Social Media)
अनुष्का शर्माचे 2017 मध्ये लग्न झाले होते. तिच्या लग्नाची वेषभूषा डिझायनर सब्यसाची यांनी डिझाइन केली होती. त्याचवेळी नेहा कक्कड हिचाही मल्टीकलर लहंगा सब्यसाची यांनी डिझाइन केला आहे. (Photo Credit - Social Media)
बर्याच ठिकाणी नेहा कक्कर आणि रोहनप्रीतने अनुष्का आणि विराटसारख्या पोज दिल्या आहेत. (Photo Credit - Social Media))