Jawan: जवान आधी 'या' चित्रपटात दिसली असती नयनतारा आणि शाहरुखची केमिस्ट्री; पण अभिनेत्री नाकारली ऑफर

शाहरुख खान आणि नयनतारा यांच्या 'जवान' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातील शाहरुख आणि नयनताराच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
फार कमी लोकांना हे माहित असेल की जवान चित्रपटाच्या आधीही ही शाहरुख आणि नयनतारा ही जोडी एका चित्रपटात एकत्र दिसणार होती. मात्र अभिनेत्रीने चित्रपटासाठी नकार दिला.

'जवान'पूर्वी नयनताराला शाहरुख खानसोबत 'चेन्नई एक्सप्रेस' चित्रपटाची ऑफर आली होती. हा ब्लॉकबस्टर चित्रपट रोहित शेट्टीने बनवला होता. एका रिपोर्टनुसार, वन टू थ्री फोर या गाण्याची नयनताराला देण्यात आली होती.
नयनताराने काही वैयक्तिक कारणांमुळे शाहरुख खानच्या वन टू थ्री फोर या गाण्याची ऑफर नाकारली. यानंतर प्रियमणी या गाण्यात शाहरुखसोबत डान्स करताना दिसली.
'जवान' चित्रपटामध्ये शाहरुख खान आणि नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, सुनील ग्रोवर आणि दीपिका पदुकोण या कलाकारांनी महत्वाची भूमिका साकारली आहे.
जवानमधील नयनताराच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं आहे.
'जवान' या चित्रपटाचे दिग्दर्शन अॅटली यांनी केले आहे. या चित्रपटामधील अॅक्शन सीन्सचं अनेकांनी कौतुक केलं.
जवान चित्रपटानंतर आता नयनाराच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
नयतारा आणि विग्नेश यांनी 2022 मध्ये लग्नगाठ बांधली ते दोघे एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात.