समंथासोबत काडीमोड, दुसरं लग्नही केलं; घटस्फोटावर बोलताना नागा चैतन्य चांगलाच संतापला!

सिनेक्षेत्र हे असे क्षेत्र आहे, ज्यात अनेक कलाकारांच्या प्रेमकथा चांगल्याच प्रसिद्ध आहे. यातील काही कलाकार असे आहेत, ज्यांनी आपला संसार नेटाने थाटला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
तर काही कलाकारांचे लग्न मध्येच मोडले. कालांतराने या कलाकारांनी आपल्या जोडीदारासोबत रितसर घटस्फोट घेतला. यात अभिनेत्री समंथा रुथ प्रभू अणि अभिनेता नागा चैतन्य यांच्या लग्नाचाही समावेश आहे.

image 3
सिनेसृष्टीत ही जोडी कधीकाळी सर्वांची आडवती होती. आता मात्र वैयक्तिक कारणामुळे ते अधिकृतरित्या विभक्त झालेले आहेत. विशेष म्हणजे घटस्फोटानंतर नागा चैतन्यने दुसरा संसारही थाटला आहे.
समंथा आणि नागा चैतन्यचा घटस्फोटाला चार वर्षे लोटली असली तरी अद्याप या दोघांची वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चा होता.
दरम्यान, त्यांच्या याच घटस्फोटाच्या निर्णयावर नागा चैतन्यने पहिल्यांदाच मौन सोडले आहे. तो त्याच्या घटस्फोटावर भरभरून बोलला आहे.
नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू यांनी 2021 साली घटस्फोट घेतला होता. त्यानंतर गेल्या वर्षी नागा चैतन्यने दुसरं लग्न केलं आहे. याच घटस्फोटावर नागा चैतन्यने प्रतिक्रिया दिली आहे. नागा चैतन्यचा थंडेल हा चित्रपट येत आहे.
या चित्रपटात त्याच्यासोबत साई पल्लवी ही अभिनेत्री दिसणार आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनासाठी तो सगळीकडे फिरत आहे.
याच प्रमोशनच्या एका कार्यक्रमात तो घटस्फोटावर बोलला आहे. मी तसेच समंथा आम्हा दोघांनाही आमच्या-आमच्या आयुष्यात वेगवेगळ्या पद्धतीने पुढे जायचे होते. त्यानुसार आम्ही पुढे गेलो आहोत. मात्र आमच्या वैयक्तिक आयुष्याबाबत लोकांना जाणून का घ्यायचं आहे? हे मला समजत नाहीये, असं नागा चैतन्यने म्हटलं आहे.
आम्ही दोघांनीही एकत्रपणे हा निर्णय घेतला. आमच्या दोघांच्याही या निर्णयाचा आम्ही सन्मान करतो. आमच्या खासगी आयुष्याचा लोक सम्नान करतील, असे वाटले होते. पण तसे झाले नाही. आमचा घटस्फोट लोकांसाठी चर्चेचा विषय झाला, असेही नागा चैतन्यने म्हटले.
आता आम्ही दोघेही आमचे-आमचे आयुष्य जगत आहोत. मला पुन्हा एकदा प्रेम मिळाल्यामुळे माझी आई फार आनंदी आहे. मी समंथाचाही खूप सन्मान करतो. घटस्फोटाचा प्रकार फक्त माझ्यासोबतच झालेला नाही. मग लोक माझ्याशी गुन्हेगारासारखा व्यवहार का करत आहेत, असा सवालही नागा चैतन्यने केला.