SRK Controversial Movies: केवळ 'पठाण' नाही, तर किंग खानचे हे चित्रपट देखील अडकले होते वादाच्या भोवऱ्यात
बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असलेला शाहरुख खान हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. पण त्याचे काही चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. सध्या त्याच्या पठाण या चित्रपटाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. या चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यावर काही लोकांनी आक्षेप घेतला आहे. जाणून घेऊयात शाहरुखचे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले चित्रपट...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपठाण या चित्रपटातील बेशरम रंग हे गाणं सध्या चर्चेत आहे. या गाण्यामुळे बायकॉट पठाण हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.
पठाण चित्रपटातील बेशरम रंग हे गाणं रिलीज झाल्यानंतर या गाण्यातील दीपिका पादुकोणच्या कपड्यांच्या रंगावरुन वाद निर्माण झाला.
भाजप कार्यकर्ते अरुण यादव यांनी बॉयकॉट पठाण हा हॅशटॅग वापरुन एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी दीपिका आणि शाहरुख खान यांचा एक फोटो शेअर केला आहे. या ट्वीटमध्ये अरुण यादव यांनी लिहिलं, 'पठाण चित्रपटामध्ये दीपिकानं भगव्या रंगाचा पोषाख परिधान केला आहे आणि गाण्याचं नाव बेशरम रंग असं ठेवण्यात आलं आहे. '
शाहरुखचा ‘रईस’ (Raees) हा चित्रपट 25 जानेवरी 2017 रोजी प्रदर्शित झाला होता.
‘रईस’ (Raees) या चित्रपटात किंग खानसोबत पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान मुख्य भूमिकेत होती. पाकिस्तानी कलाकाराने भारतीय चित्रपटात काम केल्याने बराच वाद झाला होता.
माय नेम इज खान' हा शाहरुखचा चित्रपट 2010 मध्ये प्रदर्शित झाला होता.
चित्रपटाची संकल्पना आणि माय नेम इज खान अँड आय एम नॉट ए टेरेरिस्ट या चित्रपटाच्या टॅग लाईनमुळे वाद निर्माण झाला होता.