Dhanush: 'कॅप्टन मिलर'च्या टीझरमधील धनुषचा लूक पाहिलात?
धनुष हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधनुषच्या 'कॅप्टन मिलर' (Captain Miller) या आगामी चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या टीझरमध्ये धनुष हा हटके लूकमध्ये दिसत आहे.
'कॅप्टन मिलर' या चित्रपटाच्या टीझरमध्ये धनुषचा अॅक्शन अंदाज दिसत आहे. या एक मिनिट 33 सेकंदाच्या टीझरमध्ये धनुषचा रावडी लूक दिसत आहे.
'कॅप्टन मिलर' या चित्रपटाच्या टीझरमध्ये धनुष हा हातात बंदुक वाढलेली दाढी अशा लूकमध्ये दिसत आहे.
धनुषच्या 'कॅप्टन मिलर' या चित्रपटाचे दिग्दर्शन अरुण माथेश्वरन यांनी केले आहे.
'कॅप्टन मिलर' हा चित्रपट 15 डिसेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे.
'कॅप्टन मिलर' या चित्रपटात धनुषसोबतच सुदीप किशन, नासर, एलंगो कुमारवेल, एडवर्ड सोनेनब्लिक, विजी चंद्रशेखर, निवेदिथा सतीश, जॉन कोककेन, विनोथ किशन, बाला सरवनन, सुमेश मूर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.
काही दिवसांपूर्वी धनुषनं त्याच्या 'कॅप्टन मिलर' या चित्रपटामधील लूकचा फोटो शेअर केला होता. या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला.