अरिजीत सिंहच्या दर्दी आवाजामागील कहाणी
ब्रेक अप झाल्यानंतर अथवा प्रेमात पडल्यानंतर प्रत्येकजण अरिजीतचं गाणं ऐकतोच... पण त्याच्या आवाजात इतक्या भावना का दडलेल्या आहेत? याचा कधी विचार केला का? पाहूयात अरजितच्या आयुष्याबद्दल...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअरिजीतची गाणी ऐकल्यानंतर प्रत्येकाला आपल्या प्रेमाची आठवण होतोच... पण त्याच्या आयुष्यातही तितकेच दु:ख होतं. बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अरिजीत सिंहनं आपल्या जादुई आवाजानं अनेकांची मंनं जिंकली आहेत. सध्या बॉलिवूडमधील आघाडीचा गायक आहे.
पश्चिम बंगालमध्ये जन्मलेल्या अरिजीतचं लहानपण संगीत शिकण्यात गेलं. त्याची आजी आणि आई गायिका होत्या.
अरिजीत आपल्या खासगी आयुष्याबद्दल जास्त बोलत नाही, पण एका मुलाखतीमध्ये त्यानं आपल्या पहिल्या लग्नाबद्दल सांगितलं.
अरिजीत सिंहच्या पहिल्या पत्नीचं नाव रूपरेखा होतं. ‘गुरुकुल’ चित्रपटाच्या सेववर दोघांची ओळख झाली होती. तिथेच त्यांच्या लव्ह लाईफला सुरुवात झाली होती. 2013 मध्ये दोघांनी लग्न केलं होतं.
रूपरेखा बनर्जी आणि अरिजीत सिंह यांचं नात फार काळ टिकलं नाही. 2013 मध्ये त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानंतर अरिजीतच्या आयुष्यात कोमल रॉय आली होती. 20 जानेवारी 2014 त्यांनी लग्न केले होते. कोमल अरिजीतची बालपणीची मैत्रीण आहे.
अरिजीतप्रमाणे कोमलचेही हे दुसरं लग्न होय... पण त्यानंतर तिचाही घटस्फोट झाला होता. 2014 मध्ये अरिजीत आणि कोमल यांनी लग्न केलं.