Maharashtra Shahir: सना शिंदेची खास पोस्ट;म्हणाली, 'माझा पहिला चित्रपट...'

महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर आता सनानं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

(Sana Shinde/instagram)

1/8
महाराष्ट्र शाहीर (Maharashtra Shahir) या चित्रपटात अभिनेत्री सना शिंदेनं शाहीर साबळे यांच्या पहिल्या पत्नी भानुमती यांची भूमिका साकारली आहे.
2/8
महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर आता सनानं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
3/8
सनानं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये केदार शिंदे, अंकुश चौधरी आणि सनाची आजी दिसत आहे.
4/8
फोटोला तिनं कॅप्शन दिलं, 'काल माझ्या आजी ‘माई’ ने महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट पाहिला आणि तिची प्रतिक्रिया मला जाणून घ्यायची होती. हा परफेक्ट कॅनडीड फोटो आहे, ज्यामध्ये अंकुश हा आनंदाचा क्षण कॅमेऱ्यात कैद करत आहे. तिने मला भानुमतीशी असलेल्या तिच्या नात्याबद्दल सांगितले. हा माझा पहिला चित्रपट आणि तिचा प्रतिसाद हा खूप महत्त्वाचा होता. असच अजून शिकत राहीन, प्रामाणिकपणे काम करत राहीन.'
5/8
सनाच्या महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचं अनेक जण कौतुक करत असते.
6/8
सना ही सोशल मीडियावर अॅक्टिव असते. तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते.
7/8
सनाला इन्स्टाग्रामवर 15.5K एवढे फॉलोवर्स आहेत.
8/8
सनाचे सोशल मीडियावरील फोटो अनेकांचे लक्ष वेधतात.
Sponsored Links by Taboola