Madhuri Dixit- Ajay Jadeja: जडेजासोबत माधुरीच्या अफेअरच्या चर्चा, मॅच फिक्सिंगमध्ये नाव आल्यानंतर केलं ब्रेकअप
Madhuri Dixit- Ajay Jadeja: भारतीय क्रिकेट संघाचा हँडसम बॉय म्हटल्या जाणाऱ्या अजय जडेजासोबत माधुरी दीक्षितच्या अफेअरची बरीच चर्चा झाली होती.
Madhuri Dixit Ajay Jadeja
1/9
बॉलीवूडचे प्रसिद्ध स्टार्स आणि क्रिकेटर्स एकमेकांच्या प्रेमात पडल्याचं आपल्याला अनेकदा दिसतंय. काहींनी आपलं नातं पुढे नेलं, तर काही जोडप्यांचं ब्रेक अप झालं.
2/9
माधुरी दीक्षित ही बॉलीवूडमधील 90 च्या दशकातील सर्वात सुंदर नायिका मानली जाते.
3/9
भारतीय क्रिकेट संघाचा हँडसम बॉय म्हटल्या जाणाऱ्या अजय जडेजासोबत माधुरी दीक्षितच्या अफेअरची बरीच चर्चा झाली होती. परंतु अनेक कारणांमुळे त्यांचे नाते पुढे जाऊ शकले नाही.
4/9
खरंतर माधुरी दीक्षित आणि अजय जडेजा यांची पहिली भेट एका मॅगझीन फोटोशूटमध्ये झाली होती आणि त्यांची मैत्रीही घट्ट होत चालली होती. त्यानंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
5/9
एवढेच नाही तर अजय आणि माधुरी दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. या दोघांची लव्हस्टोरी अजय जडेजाच्या कुटुंबीयांना मान्य नव्हती.
6/9
अजय जडेजा क्रिकेटपटू व्यतिरिक्त नवानगरच्या राजघराण्याशी संबंधित होता. येथे तो एका राजकुमाराप्रमाणे वाढला आणि त्याचे पूर्ण नाव अजय सिंहजी जडेजा आहे.
7/9
अजय आणि माधुरीचे हे नाते अजयच्या कुटुंबीयांना अजिबात मान्य नव्हतं. माधुरी अभिनेत्री आहे आणि ती एका सामान्य कुटुंबातून आली आहे, यामुळे अजयच्या कुटुंबीयांनी त्याला विरोध केल्याचं सांगितलं जातंय.
8/9
अचानक 1999 मध्ये अजय जडेजाचे नाव मॅच फिक्सिंगमध्ये आले. त्यानंतर अजयच्या करिअरचा ग्राफ खाली येत गेला.
9/9
या घटनेनंतर अजय आणि माधुरीचे ब्रेक अप झाल्याचं सांगितलं जातंय. माधुरी यानंतर अमेरिकेला गेली आणि तिने श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं.
Published at : 19 Apr 2023 10:28 PM (IST)