Lucky Ali Controversy: फेसबुक पोस्टमुळे लकी अली अडकला वादाच्या भोवऱ्यात; माफी मागत म्हणाला...
बॉलिवूड गायक, संगीतकार लकी अली (Lucky Ali) हा सध्या त्याच्या एका फेसबुक पोस्टमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलकी अलीने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये त्याने ब्राह्मण या शब्दाची निर्मिती अब्राम यावरून झाल्याचा दावा केला होता.
आता या पोस्टमुळे लकी अली वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ती पोस्ट लकी अलीनं डिलीट केली.
पोस्टमुळे निर्माण झालेल्या वादामुळे लकी अलीनं सोशल मीडियावर नेटकऱ्यांची माफी मागितली आहे.
लकी अलीनं फेसबुकवर एक पोस्ट शेअर करुन चाहत्यांची माफी मागितली. त्यानं पोस्टमध्ये लिहिलं, 'मी शेअर केलेल्या पोस्टमुळे निर्माण झालेल्या कॉन्ट्रोव्हर्सीची मला जाणीव आहे. कोणताही वाद निर्माण करण्याचा माझा हेतू नव्हता. मला याचा खूप पश्चाताप होत आहे. सर्वांना जवळ आणण्याचा माझा हेतू होता, पण मला जे हवे होते ते घडले नाही हे मला जाणवले.'
पुढे पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, 'सोशल मीडियावर पोस्ट करताना मी काळजी घेईन, यामुळे माझे काही हिंदू भाऊ बहीण नाराज झाले. मी सर्वांची माफी मागतो. मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो.'
लकी अलीच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
लकी अली यांचे ‘ओ सनम’ हे गाणे आजही प्रेक्षक आवडीनं ऐकतात.