PHOTO: जाणून घ्या बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता आयुष्मान खुरानाबद्दलच्या खास गोष्टी..
बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) आज (14 सप्टेंबर) आपला 34वा वाढदिवस साजरा करत आहे. (फोटो सौजन्य :ayushmannk//इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्या मेहनतीच्या बळावर आयुष्मानने बॉलिवूड इंडस्ट्रीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. (फोटो सौजन्य :ayushmannk//इंस्टाग्राम)
फार कमी लोकांना माहित असेल की, आयुष्मानने वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी ग्लॅमरच्या दुनियेत प्रवेश केला होता. इतकंच नाही तर, वयाच्या 20व्या वर्षापर्यंत त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.(फोटो सौजन्य :ayushmannk//इंस्टाग्राम)
अभिनेता आयुष्मान खुराना याचा जन्म 14 सप्टेंबर 1984 रोजी चंदीगडमध्ये झाला. चंदीगडमध्ये शिकत असताना, वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी आयुष्मानने टीव्हीवर गायक म्हणून आपली कारकीर्द सुरु करण्याची तयारी केली होती. (फोटो सौजन्य :ayushmannk//इंस्टाग्राम)
त्याने 2002 मध्ये चॅनल Vच्या ‘पॉपस्टार्स’ या कार्यक्रमात भाग घेतला होता. मात्र, या कार्यक्रमात त्याला फारसे यश मिळाले नाही. मात्र, त्याने आपली मेहनत आणि जिद्द अजिबात सोडली नाही.(फोटो सौजन्य :ayushmannk//इंस्टाग्राम)
2004 मध्ये आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) एमटीव्हीच्या 'रोडीज' शोमध्ये झळकला होता. या शोचे विजेतेपदही त्याने पटकावले होते. या यशानंतर त्याने अँकरिंगमध्ये पाऊल ठेवले. इथूनच आयुष्मानच्या करिअरची सुरुवात झाली. या संघर्षाच्या काळात स्वतःचा खर्च भागवण्यासाठी आयुष्मान चक्क ट्रेनमध्ये गाणी गायचा आणि पैसे मिळवायचा. मेहनतीच्या बळावर आज त्याने बॉलिवूडमध्ये हक्काचे स्थान पटकावले आहे.(फोटो सौजन्य :ayushmannk//इंस्टाग्राम)
आयुष्मान खुराना चित्रपटात येण्यापूर्वी रेडिओमध्ये आरजेही म्हणून काम करत होता. त्याआधी, त्याने याचा अभ्यास केला आणि थिएटरमध्ये कठोर परिश्रम केले.(फोटो सौजन्य :ayushmannk//इंस्टाग्राम)
त्यानंतर त्याने बिग एफएम रेडिओ चॅनलवर आरजे म्हणून 'बिग चाय: मान ना मान, मैं तेरा आयुष्मान' सारखा सुपरहिट शो केला. आरजे असताना त्याला ‘यंग अचिव्हर्स अवॉर्ड’, ‘भारत निर्माण अवॉर्ड’ मिळाले. यानंतर आयुष्मान व्हीजे म्हणून टीव्हीकडे वळला आणि एमटीव्हीसोबत अनेक शो केले.(फोटो सौजन्य :ayushmannk//इंस्टाग्राम)
आयुष्मानने कलर्स वाहिनीच्या रिअॅलिटी शोचे अँकरिंग देखील केले आहे. स्टार प्लसचा शो ‘जस्ट डान्स’मध्ये त्याने सूत्रसंचालन केले.(फोटो सौजन्य :ayushmannk//इंस्टाग्राम)
आयुष्मान खुरानाने (Ayushmann Khurrana) 2012 मध्ये 'विकी डोनर' या चित्रपटातून आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटातील 'पानी दा रंग' हे गाणेही त्याने गायले होते. चित्रपटासोबतच त्याचे हे गाणेही सुपरहिट झाले होते. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरसह अनेक मोठे पुरस्कार मिळाले. ‘विकी डोनर’नंतर आयुष्मानने ‘नौटंकी साला’ हा चित्रपट केला होता. यानंतर त्याने ‘हवाईजादा’, ‘दम लगा के हैशा’, ‘बरेली की बर्फी’, ‘दम लगा के हैशा’, ‘अंधाधुंद’, ‘अनेक’सारखे हिट चित्रपट केले आहेत.(फोटो सौजन्य :ayushmannk//इंस्टाग्राम)