Kishore Kumar : रसिकांच्या मनावर राज्य करणारा सदाबहार गायक किशोर कुमार...
रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारं नाव म्हणजे किशोर कुमार. आज किशोर कुमार यांची पुण्यतिथी आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकिशोर कुमार यांनी वयाच्या अवघ्या 57व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.
उत्तम गायक असण्यासोबतच किशोर कुमार हे लेखक, चित्रपट निर्माते आणि पटकथा लेखक देखील होते.
1948 मध्ये आलेल्या 'बॉम्बे टॉकीज' चित्रपटात किशोर कुमार यांनी पार्श्वगायक म्हणून पहिले गाणे गायले होते.
किशोर कुमार यांनी त्यांच्या कारकिर्दीत हिंदीसह अनेक भाषांमध्ये तब्बल 2000 हून अधिक गाणी गायली आहेत.
किशोर कुमार यांना पार्श्वगायनासाठी आठ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते.
शिकारी या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती.
त्यांनी जवळपास 80 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
एक अभिनेता, शानदार गायक, निर्माता, पटकथाकार आणि अप्रतिम संगीतकार अशा विविध गुणांनी संपन्न असलेले किशोर कुमार घराघरात पोहोचले आहेत.
दर्दभरे गाणी असतील वा सुंदर प्रेमगीतं किंवा उत्साही आणि उर्जेने भरलेली गीतं... या सर्वांमध्ये किशोर कुमार हे चपखलपणे गाणं गायचे.