कोणत्या अभिनेत्रीच्या नाहीतर, चक्क अभिनेत्याच्या प्रेमात वेडा झालेला 'किंग खान'; लग्नापर्यंत पोहोचलेलं प्रकरण, तुम्हाला माहितीय का?
बॉलिवूडचा किंग शाहरुख खान त्याच्या विनोदबुद्धीसोबतच स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखला जातो. काही वर्षांपूर्वी किंग खाननं असं वक्तव्य केलं होतं की, सर्वांनाच आश्चर्य वाटलं. खरंतर शाहरुख खाननं एकदा म्हटलं होतं की, तो एका बॉलिवूड अभिनेत्याच्या प्रेमात पडला असून त्याला लग्न करायचं आहे. पत्नी गौरी खानवर प्रचंड प्रेम असूनही किंग खान चक्क एका अभिनेत्याच्या प्रेमात पडला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजेव्हा शाहरुख खाननं अभिनेत्रीशी नाही तर, अभिनेत्याशी लग्न करण्याबद्दल बोलला तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटलेलं. अनेकांना तर शाहरुखला नेमकं झालंय काय? असा प्रश्न पडला होता.
शाहरुख खानला ज्या अभिनेत्याशी लग्न करायचं होतं, तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून रितेश देशमुख होता. ज्याच्यासोबत शाहरुख खाननं लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
रितेश देशमुखनं स्वतः हे उघड केलं होतं. खरंतर शाहरुख खान आणि रितेश देशमुख एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. रितेशनं एकदा त्यांच्यातील मैत्रीबाबत सांगितलं होतं. त्यानं सांगितलं होतं की, किंग खाननं एकदा गंमतीनं म्हटलं होतं की, त्याला माझ्याशी लग्न करायचं आहे.
मॅशेबल इंडियाला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत बोलताना रितेश देशमुखनं शाहरुख खानला मोबाईल फोन भेट दिल्याबद्दलचा एक किस्साही सांगितला होता. त्यावेळी, आयफोन भारतात नुकताच लाँच झाला होता आणि तो बाजारात सहज उपलब्ध होत नव्हता. त्यानं सांगितलं होतं की, त्यावेळी त्यानं कसेबसे परदेशातून दोन आयफोन खरेदी केले होते. त्यापैकी एक त्यानं शाहरुख खानला भेट म्हणून दिलेला.
शाहरुख खान हा बॉलिवूडमधील अशा स्टार्सपैकी एक आहे, ज्यांना नवनव्या टेक्नॉलॉजीची आवड आहे. रितेश देशमुखनं भेट दिलेला आयफोन मिळाल्यानंतर अभिनेता खूप एक्सायटेड झाला.
यानंतर, सुपरस्टारनं रितेश देशमुखला फोन केला आणि आयफोनबद्दल आभार मानले. रितेशनं याबद्दल सांगितलं होतं की, 11 वाजेपर्यंत शाहरुखनं मला फोन केला आणि म्हणाला, रितेश, हे काय आहे यार, हे तर माईंडब्लोईंग आहे.
रितेशनं त्याला सांगितलं की, त्यानं त्याला एक भेट पाठवली आहे. यावर शाहरुखनं एक मजेदार प्रतिक्रिया दिली आणि म्हणाला, मी तुला एक गोष्ट सांगू इच्छितो. मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे.” हे ऐकून रितेशही थक्क झाला होता.
कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर, रितेश 'रेड 2' आणि 'हाऊसफुल 5' च्या रिलीजसाठी सज्ज आहे.