PHOTO : ‘ग्लॅम डॉल’ खुशी कपूरचं बोल्ड अँड ब्युटीफुल फोटोसेशन!

khushi kapoor

1/6
चित्रपट निर्माते बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर अनेकदा तिच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे चर्चेत असते. आजकाल खुशी तिचा आगामी चित्रपट 'द आर्चिज'मुळे चर्चेत आहे.
2/6
झोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटातून खुशी कपूरचा फर्स्ट लूक समोर आला आहे, जो चाहत्यांना खूप आवडला आहे. आता खुशीचा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे.
3/6
खुशी कपूरने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. अभिनेत्रीचे हे फोटो अलीकडेच धर्मा प्रोडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत क्लिक करण्यात आले होते.
4/6
फोटोंमध्ये ती सोनेरी केस आणि बँगसह दिसत आहे. यादरम्यान खुशीने गोल्डन कलरचा बॅकलेस परिधान केला आहे, ज्यामध्ये ती सौंदर्याचा जलवा दाखवत आहे. खुशीचा हा लूक ‘द आर्चिज’ चित्रपटासारखाच आहे.
5/6
पहिल्या फोटोमध्ये खुशी स्वतःला आरशात बघताना दिसत आहे. त्यात ती मिरर सेल्फी घेत आहे. दुसऱ्या फोटोत खुशीने आरशासमोर बसून वेगळी पोज दिली आहे.
6/6
फोटोंमध्ये, खुशीने तिच्या टॅटूची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. खुशी कपूरच्या फोटोवर चाहते आणि सेलिब्रिटी जोरदार कमेंट करत आहेत. (Photo : @khushi05k/IG)
Sponsored Links by Taboola