PHOTO : कतरिनाच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन, समुद्र किनाऱ्यावर अभिनेत्रीने मैत्रिणींसोबत केली धमाल!

नुकताच अभिनेत्री कतरिना कैफ हिने तिचा वाढदिवस साजरा केला. हा खास दिवस साजरा करण्यासाठी ती मालदीवमध्ये गेली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
तिच्यासोबत तिचा पती विकी कौशल, मेहुणा सनी कौशल आणि तिचे जवळचे मित्रमैत्रिणी देखील आहेत. याची झलक कतरिना कैफने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर दाखवली आहे.

अभिनेता विकी कौशल याने पत्नी कतरिना कैफला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
कतरिना कैफने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे.
एका फोटोत कतरिना कैफ कॅमेऱ्याकडे बघताना दिसत आहे. तर, दुसऱ्या फोटोंमध्ये ती तिच्या गर्ल गँगसोबत धमाल करताना दिसत आहे.
कतरिना कैफच्या फोटोमध्ये जेव्हा ती गर्लगँगसोबत पोज देत होती, तेव्हा सनी कौशल पुढे आला आणि झोपला. हा फोटोही खूप क्यूट दिसत आहे. (Photo : @Katrina Kaif/IG)