एका परफेक्ट KISS सीनसाठी 37 रिटेक, अभिनेत्रीचीही हालत खराब; अभिनेत्याने सांगितला किस्सा

Entertainment Kissa : एक किस सीन देण्यासाठी एक-दोन नव्हे, तर 37 रिटेक द्यावे लागल्याचं या अभिनेत्याने मुलाखतीत सांगितलं.

Entertainment Kissa

1/12
Entertainment News : बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपट रिलीज होतात. काही सुपरहिट ठरतात, तर काही सुपरफ्लॉर ठरतात. त्यातच एखादा चित्रपट हिट ठरण्यासाठी कधी-कधी एखादा सीन किंवा शॉटही पुरेसा असतो.
2/12
कधी-कधी शॉट मिळण्यासाठी कलाकारांना खूप मेहनतही करावी लागते. एका अभिनेत्या एका मुलाखतीत खुलासा केला होता की, त्याला परफेक्ट किसिंग सीन देण्यासाठी 37 टेक घ्यावे लागले होते.
3/12
या अभिनेत्याला एक किसिंग सीन खूपच महागात पडला. हा रोमँटिक सीन करण्यासाठी त्याला 37 टेक द्यावे लागले, त्यामुळे हा सीन कलाकारांसाठी अक्षरक्ष: डोकेदुखी ठरला. हा किस्सा नेमका काय आहे, ते जाणून घ्या.
4/12
हा अभिनेता आहे कार्तिक आर्यन. त्याने एका मुलाखतीत परफेक्ट किसिंग सीनचा किस्सा सांगितला होता, ज्यासाठी त्याला एक किंवा दोन नाही, तर 37 टेक द्यावे लागले होते, त्यामुळे त्याची आणि अभिनेत्रीचीही हालत खराब झाली होती.
5/12
अभिनेता कार्तिक आर्यन फिल्म इंडस्ट्रीमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. 'प्यार का पंचनामा' चित्रपटातून त्याला खरी प्रसिद्धी मिळाली. यासोबतच सोनू के टीटू की स्वीटी, लुका छुपी, भूल भुलैया 2, भूल भुलैया 3 आणि चंदू चॅम्पियन असे अनेक हिट चित्रपट त्याच्या नावावर आहेत.
6/12
बॉलिवूडचा चॉकलेट बॉय अभिनेता कार्तिक आर्यन याने इंडस्ट्रीमध्ये कुणीही गॉडफादर नसताना मेहनतीच्या बळावर स्वत:चं स्थान कमावलं आहे. एका मुलाखतीत कार्तिकने रोमँटिंक सीनचा किस्सा सांगितला होता.
7/12
कार्तिक आर्यनने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्याला एका रोमँटिक सीनसाठी चक्क 37 टेक द्यावे लागले होते. हा एक किसिंग सीन होता.
8/12
सुभाषी घई दिग्दर्शित 'कांची : द अनब्रेकेबल' चित्रपटावेळीचा हा किस्सा आहे. मिथुन चक्रवर्ती आणि ऋषि कपूर यांनीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
9/12
'कांची : द अनब्रेकेबल' चित्रपटामध्ये अभिनेत्री मिष्टी चक्रवर्तीने मुख्य भूमिका साकारली होती. चित्रपटात मिष्टी आणि कार्तिक यांच्यात एक किसिंग सीन होता.
10/12
फिल्मफेयरला दिलेल्या मुलाखतीत कार्तिक आर्यनने सांगितलं होतं की, "सुभाष घई यांना एक पॅशनेट किसिंग सीन हवा होता".
11/12
पुढे त्याने सांगितलं की, "मला माहित नव्हतं किस कसं करायचं आहे. मी तर त्यांनाच विचारणार होतो की, 'सर प्लीज' मला सीन कसा करायचा आहे दाखवा".
12/12
कार्तिक म्हणाला की, "मला वाटलं नव्हतं की, एक किसिंग सीन इतकी डोकेदुखी ठरेल. अखेर आम्ही प्रेमींप्रमाणे तो सीन दिला आणि सुभाषजींना तो आवडला." कार्तिकने सांगितलं की, या सीनसाठी आम्हाला 37 रिटेक्स द्यावे लागले, तेव्हा सुभाषजींना हवा तसा सीन मिळाला.
Sponsored Links by Taboola