Kangana Ranaut: कॉन्ट्रोव्हर्सी क्विन कंगना रनौत कोट्यवधींची मालकीण; जाणून घ्या संपत्तीबाबत...
राजकारण असो किंवा बॉलिवूड, प्रत्येक क्षेत्राबद्दल आपलं मत बिंधास्तपणे मांडणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतचा (Kangana Ranaut) आज 36 वा वाढदिवस आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकंगनाचा जन्म 1987 मध्ये हिमाचल प्रदेशमधील मंडी येथे झाला. कंगनाला मनोरंजनक्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा होती. तिच्या या इच्छेला तिच्या कुटुंबाचा विरोध होता. त्यामुळे तिनं वयाच्या 16 व्या वर्षी घर सोडण्याचा निर्णय घेतला.
16 व्या वर्षी घर सोडून कंगना दिल्ली येथे गेली. दिल्लीमध्ये कंगनानं मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली.
सुरुवातीच्या काळात तिला अनेकवेळा लोणचं आणि पोळी खाऊन दिवस काढावे लागले. कारण तिला कुटुंबाकडून आर्थिक मदत मिळत नव्हती.
एकेकाळी आर्थिक अडचणींचा समाना करणारी कंगना आज कोट्यवधींची मालकीण आहे.
एका मीडिया रिपोर्टनुसार, कंगना 96 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे.
वर्षभरात कंगना ही 15 कोटींची कमाई करते. चित्रपटांबरोबरच कंगना जाहिरातींमध्ये देखील काम करते.
फॅशन, तनु वेड्स मनु, क्विन तनु वेड्स मनु रिटर्न्स, मणिकर्णिका यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं.
कंगनाच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करतात.
कंगनाचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.