एकाचवेळी अनेकांसोबत संबंध, अभिनेत्रीनं स्वतःच केला खुलासा; आता म्हणतेय, '...वेळ नाही'
बॉलिवूडची वर्सटाईल अभिनेत्री म्हणजे, कल्की कोचलिन. कल्कीनं आजवर काही मोजकेच चित्रपट केले आहेत. पण त्यातून तिनं आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'देव डी' चित्रपटापासून कल्कीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर कल्कीने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. तिच्या ग्लॅमरस शैलीनं आणि आकर्षक अभिनयानं लाखो चाहत्यांना वेड लावलं.
आपल्या अभिनयासोबतच आपल्या बोल्ड विचारांसाठीही कल्की नेहमीच चर्चेत असते. कल्की कोचलिन तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त चर्चेत असते.
आधी अनुराग कश्यपसोबत अचानक लग्न, नंतर अचानक ब्रेकअप आणि नंतर लग्नाआधी गरोदर राहणं, यांसारख्या गोष्टींमुळे कल्की नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या कल्कीनं एका मुलाखतीवेळी पॉलिएमरी रिलेशनशिपवर (Polyamory Relationship) मोकळेपणानं संवाद साधला होता. तसेच, यादरम्यान तिनं बेधडकपणे आपल्या खासगी आयुष्यातील काही गोष्टी शेअर केल्या होत्या.
हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीदरम्यान कल्कीनं सांगितलं की, ती यापूर्वी पॉलिएमरी रिलेशनशिपमध्ये राहिलेली आहे. तथापि, ही त्याच्या भूतकाळातील गोष्ट आहे आणि आता कुटुंब सुरू केल्यानंतर, त्याच्याकडे या सर्वांसाठी वेळ नाही किंवा त्याला त्यात रस नाही.
Polyamory हा ग्रीक आणि लॅटिन भाषेतील दोन शब्दांपासून बनलेला आहे. पॉली म्हणजे अनेक किंवा एकापेक्षा जास्त आणि amory म्हणजे प्रेम. म्हणजे एका वेळी एकापेक्षा जास्त व्यक्तींवर प्रेम करण्याची प्रथा. याला आपण बहुविध संबंध असेही म्हणू शकतो.
अशा रिलेशनशिपबाबतच्या प्रश्नावर कल्की बोलताना म्हणाली की, मी आता विवाहित आहे आणि मला एक मुलगीही आहे. आता या सगळ्यासाठी माझ्याकडे वेळ नाही.
अभिनेत्री म्हणाली की, मी माझ्या भूतकाळात अशा रिलेशनशिपमध्ये होते. ही व्यक्तीची स्वतःची निवड आहे. अशा रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या लोकांना स्वतःसाठी काही नियम आणि सीमा निर्माण कराव्या लागतात.
कल्की पुढे बोलताना म्हणाली की, तो काळ माझ्या आयुष्यातील खूप वेगळा होता. त्यावेळी मी खूप लहान होते, मला माझा संसार थाटण्यात अजिबातच रस नव्हता, म्हणून कदाचित अशी नाती माझ्यासाठी उत्तम होती.
पण आता मी पूर्णपणे वेगळी आहे. इतरांप्रमाणे मीही आता पॉलिमरी सारख्या नात्यात राहू शकत नाही., असंही कल्की पुढे बोलताना म्हणाली.