50 Years Of Jaya Bachchan: चित्रपटसृष्टीत जया बच्चनचं अर्धशतक! Abhishek Bachchaan ने फोटोंमधून दाखवला आईचा प्रवास
जया बच्चन
1/6
'अभिमान', 'गुड्डी', 'मिली', 'शोले' अशा अनेक हिट चित्रपटांमध्ये झळकलेल्या जया बच्चनने नुकतेच हिंदी सिनेसृष्टीत 50 वर्ष पूर्ण केले आहेत. त्यानिमित्ताने अभिषेक बच्चनने सोशल मीडियावर एक प्रेमळ संदेश लिहिला आहे.
2/6
अभिषेकने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर जया बच्चनने केलेल्या काही चित्रपटांचे फोटोदेखील चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. त्या फोटोंसोबत त्याने एक हृदयस्पर्शी संदेशदेखील लिहिला आहे.
3/6
अभिषेक बच्चनने लिहिले, "मी जया बच्चनचा मूलगा असल्याचा मला अभिमान आहे. चित्रपटसृष्टीत आईला 50 वर्ष पूर्ण झाल्याचा मला आनंद आहे. चित्रपटसृष्टीत 50 वर्ष पूर्ण केल्याने आई तुझं अभिनंदन, आई मला तू खूप आवडतेस."
4/6
जया बच्चन यांना 1992 साली पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित केले होते. आतापर्यंत त्यांनी 45 हून अधिक सिनेमात काम केले आहे. त्यांनी बॉलिवूडमध्ये 1971 साली 'गुड्डी या सिनेमातून पदार्पण करत सुरुवात केली होती. त्यात त्यांनी धर्मेंद्रसोबत काम केले होते.
5/6
जया बच्चनने 1963 साली सत्यजीत रेंच्या 'महानगर' चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यांनी आतापर्यंत 'फिजा', 'अभिमान', 'सिलसिला', 'उपहार', 'नौकर', 'बावर्ची' अशा सिनेमांत काम केले आहे.
6/6
जया बच्चन एक अभिनेत्री असून त्याव्यतिरिक्त राजकारणी देखील आहे. जया बच्चन लवकरच करण जौहरच्या आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटातून दिसणार आहे.
Published at : 26 Sep 2021 07:45 PM (IST)