Kashmir : काश्मीरमध्ये मोठ्या पडद्यावर पाहता येणार चित्रपट; पाहा काश्मीरमधील नव्या मल्टिप्लेक्सचे फोटो
काश्मीरमधील (Kashmir) मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याची प्रतीक्षा अखेर आज संपणार आहे. (Manoj Sinha/ twitter)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App1990च्या दशकाच्या सुरुवातीस काश्मीर खोऱ्यातील सर्व थिएटर बंद करण्यात आले होते. (Manoj Sinha/ twitter)
1996 मध्ये ते पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु त्याला यश आले नाही. मात्र, आज या ठिकाणी थिएटर सुरु होणार आहे. आता राज्य प्रशासन या ठिकाणी काम करत असून, येथे चित्रपटांचे शूटिंग आणि पोस्ट प्रॉडक्शन, तसेच थिएटर सुरू करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. (Manoj Sinha/ twitter)
आतापर्यंत 500 चित्रपट निर्मात्यांनी काश्मीरमध्ये शूटिंगसाठी अर्ज केले आहेत. (Manoj Sinha/ twitter)
बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) स्टारर 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगसह मल्टिप्लेक्स आजपासून सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे.
30 सप्टेंबरपासून हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) अभिनीत ‘विक्रम वेधा’च्या (Vikram Vedha) स्क्रीनिंगसह चित्रपटांचे नियमित शो सुरू होतील. (Greater Kashmir/twitter)
काश्मीरच्या पहिल्या या मल्टिप्लेक्समध्ये एकूण 520 आसनक्षमतेची तीन चित्रपटगृहे आहेत. स्थानिक खाद्यपदार्थांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने थिएटरच्या आवारात 'फूड कोर्ट' देखील असणार आहे.(Greater Kashmir/twitter)
INOX द्वारे चालवल्या जाणाऱ्या मल्टिप्लेक्सचे नियोजित उद्घाटन करण्यात आलं आहे. (Greater Kashmir/twitter)
जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या हस्ते रविवारी, पुलवामा आणि शोपियान जिल्ह्यात प्रत्येकी एका बहुउद्देशीय सिनेमा हॉलचे उद्घाटन करण्यात आले आहे.
काश्मीरच्या खोऱ्यातील चित्रपटगृहे तब्बल तीन दशकांनंतर पुन्हा सुरू झाली आहेत.(Greater Kashmir/twitter)