Ram lakshman | ज्येष्ठ संगीतकार 'रामलक्ष्मण' यांचे गाजलेले निवडक चित्रपट
कलाविश्वात आपल्या योगदानानं प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान मिळवणाऱ्या ज्येष्ठ संगीतकार रामलक्ष्मण म्हणजेच विजय पाटील यांचं शनिवारी निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. नागपुरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'पांडू हवालदार', 'आली अंगावर', 'राम राम गंगाराम', 'पथ्थर के फुल', 'मैने प्यार किया', 'हम आपके है कौन', 'हम साथ साथ है', 'हमसे बढकर कौन' या आणि अशा जवळपास 75 पेक्षा जास्त चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं होतं.
आजही त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांना चाहत्यांची कमालीची पसंती मिळते.
विजय पाटील यांनी सुरूवातीच्या काळात सुरेंद्र हेंद्रे यांच्यासोबत संगीत द्यायाल सुरूवात केली.
सुरुवातीला पांडू हवालदार या दादा कोंडके यांच्या चित्रपटाला त्यांनी संगीत दिलं. केवळ मराठीच नव्हे, तर हिंदी, भोजपुरी चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिल. या जोडीने राम लक्ष्मण हे नाव घेतलं.
पुढे हेंद्रे यांच्या निधनानंतर रामलक्ष्मण हे नाव पाटील यांनी लावून काम करायला सुरूवात केली.
पाटील यांचा सुरूवातीला वाद्यवृंद होता. त्यात ते पिआनो आणि एकॉर्डिअन वाजवत असत. पुढे संगीत देतानाही त्यांनी अनेकदा त्यात पिआनो वाजवला आहे. पाटील यांचं योगदान लक्षात घेऊन दोन वर्षांपूर्वीच त्यांना लता मंगेशकर पुरस्कार मिळाला होता.
राम कदम आणि विजय पाटील या जोडीने संगीत द्यायला सुरुवात केली. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या अनेक गाण्यांना प्रेक्षकांचं अमाप प्रेम मिळालं. अशा या लोकप्रिय कलावंताला एबीपी माझाकडून भावपूर्ण श्रद्धांजली!