Independence Day 2023: आज स्वातंत्र्यदिनानिमित्त ओटीटीवर 'या' वेब सीरिज नक्की बघा
स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day) अशा वेब सीरिजबद्दल जाणून घेऊयात ज्यामध्ये देशभक्तीची भावना दाखवण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरॉकेट बॉईज (Rocket Boys) या सीरिजमध्ये डॉ होमी जहांगीर भाभा आणि डॉ. विक्रम अंबालाल साराभाई यांची कथा दाखवण्यात आली आहे.
रॉकेट बॉईज (Rocket Boys) या सीरिजमध्ये भारताच्या पहिल्या रॉकेट प्रक्षेपणातील त्यांचे योगदान दाखण्यात आले आहे.
द फॅमिली मॅन या वेब सीरिजमध्ये अशा एका माणसाची कथा दाखवण्यात आली आहे आहे जो तपास संस्थेसाठी काम करतो.
द फॅमिली मॅन या वेब सीरिजचे दोन सीझन आहेत. तुम्ही ही वेब सीरिज Amazon Prime वर पाहू शकता. मनोज वाजपेयी यांनी या सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे.
स्पेशल OPS आणि OPS ऑप्स 1.5 या वेब सीरिजमध्ये हिम्मत सिंह आणि त्याच्या टीमची कथा दाखवण्यात आली आहे, जे भारतीय गुप्तचर संस्थेचा भाग आहेत.
अवरोध- सीजन 1 आणि 2 ही सीरिज पॅरा एसएफ लीडर मेजर विदीप सिंह यांच्यावर आधारित आहे. ही वेब सीरिज तुम्ही सोनी लाईव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
भारतीय सैन्य हे अनेक रेजिमेंटचे कुटुंब आहे, प्रत्येकाचा स्वतःचा इतिहास, ओळख आणि गौरवशाली परंपरा आहेत. रेजिमेंट डायरी ही भारतीय सैन्याची कथा आहे . ही सीरिज तुम्ही Netflix या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.