In Pics : 'या' आठवड्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; 'जादूगर' ते 'जनहित में जारी' ओटीटीवर होणार रिलीज

OTT

1/4
'कुंगफू पांडा - द ड्रॅगन नाईट' या वेबसीरिजचा पहिला सीझन14 जुलैपासून प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार आहे. या वेबसीरिजमध्ये अॅनिमेशन मार्शल आर्ट्स आहे.
2/4
पंचायत फेम जितेंद्र कुमारचा 'जादूगर' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 15 जुलैपासून नेटफ्लिक्सवर प्रेक्षक हा सिनेमा पाहू शकतात. या सिनेमात जितेंद्र मीनू नावाचे पात्र साकारत आहे.
3/4
सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'जनहित में जारी' आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 15 जुलैपासून हा सिनेमा प्रेक्षक झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. अनेक सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. या सिनेमात नुसरत भरुचा मुख्य भूमिकेत आहे.
4/4
'शूरवीर' ही वेबसीरिज 15 जुलैपासून प्रेक्षकांना डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे. या वेबसीरिजमध्ये प्रेक्षकांना थरार नाट्य आणि अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे.
Sponsored Links by Taboola