In Pics Rinku Rajguru : 'दुनिया है मेरे पिछे लेकीन मैं तेरे पिछे' म्हणत रिंकू राजगुरूने शेअर केले रील
मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरू सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्गदेखील आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरिंकूने आता 'दुनिया है मेरे पिछे लेकिन मै तेरे पिछे' या गाण्यावर रील बनवले आहे. तिचे हे रील चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस पडत आहे.
रिंकूने निळ्या रंगाची साडी नेसली असून केसात गजराही माळला आहे. 1967 सालच्या 'किस्मत' चित्रपटातील 'दुनिया है मेरे पिछे लेकिन मै तेरे पिछेट या गाण्यावर तिने रील बनवले आहे.
रील शेअर करत तिने 'जुनी गाणी माझं प्रेम आहेत' असे कॅप्शन लिहिले आहे.
रिंकूने नागराज मंजुळेंच्या सैराट सिनेमाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता.
रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत.