In Pics : पॉपस्टार क्रिस वूलाच्या अडचणीत वाढ; 13 वर्षांचा तुरुंगवास
चीनी-कॅनडियन पॉपस्टार क्रिस वूला सध्या चर्चेत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचीनच्या न्यायालयाने बलात्कार प्रकरणी क्रिसला 13 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
18 वर्षीय तरुणीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत क्रिस वू याच्यावर बलात्काराचा आरोप केला.
आता न्यायालयाने क्रिसला दोषी ठरवले असून त्याला 13 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
क्रिसला गेल्या वर्षी डेट-रेपच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली होती.
क्रिस दक्षिण कोरियन बँड 'एक्सो'चादेखील सदस्य होता. पण 2014 साली त्याने एक्सो सोडलं.
क्रिसचा जन्म चीनमध्ये झाला असला तरी तो कॅनडाचा नागरिक आहे.
क्रिस लोकप्रिय गायक असल्याने अनेक मोठ-मोठ्या ब्रॅंड्ससोबत तो काम करत असतो.
बलात्काराच्या आरोपानंतर अनेक मोठ्या ब्रॅंड्सनी क्रिससोबतची भागीदारी संपवली. यात काही आंतरराष्ट्रीय ब्रॅंड्सचादेखील समावेश होता.
क्रिसला आता 600 मिलिअन युआन म्हणजेच 6, 82, 64, 46, 000 रुपये दंड भरावा लागणार आहे.