बॉलीवूडचे धरमपाजी हरपले! विलेपार्ले स्मशानभूमीबाहेर कलाकार दाखल होण्यास सुरुवात; पोलीस बंदोबस्त वाढवला
तब्बल सहा दशकं सिनेसृष्टीवर राज्य करणारा कोहिनूर हरपल्यानं मोठी पोकळी निर्माण झाली आहे. धर्मेंद्र यांच्या निधनानं अख्खं बॉलिवूड शोकसागरात बुडालं आहे.

dharmendra
1/9
बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले आहे. विलेपार्लेतील हिंदू स्मशानभूमीवर सध्या कलाकार दाखल होताना दिसत आहेत.
2/9
गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते.
3/9
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज ही देण्यात आला होता. तेव्हापासून ते घरीच होते.अखेर जुहूतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
4/9
ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन यांच्यासह आमिर खान व इतर कलाकार स्मशानभूमीवर दाखल झाले आहेत.
5/9
धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत असल्याची माहिती मिळत आहे. सनी देओल यांनी धर्मेंद्र यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिल्याचं कळतंय.
6/9
अधिकृतरित्या देओल परिवाराने कोणतेही माहिती दिलेली नाहीये. काही वेळात परिवारातील सदस्य येऊन अधिकृत पुष्टी करेल असे सांगण्यात येत आहे.
7/9
या भागात सध्या पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पवनार स्मशानभूमीच्या बाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
8/9
साधारण तीन वाजताच्या सुमारास धर्मेंद्र यांच्या जुहू येथील घराबाहेर रुग्णवाहिका आली. ही रुग्णवाहिका विलेपार्ले येथील स्मशानभूमीवर आली.
9/9
या बातमीबद्दल प्रचंड गुप्तता पाळली गेली आहे. ठराविक लोकांनाच धर्मेंद्र यांच्याबाबत सांगण्यात आल्याचं कळतंय. तब्बल 6 दशक सिनेसृष्टीवर राज्य करणारा कोहिनूर हरपल्याची भावना समस्त मनोरंजनसृष्टीत आहे.
Published at : 24 Nov 2025 02:27 PM (IST)