Hrithik Roshan: दोन मुलांसह गर्लफ्रेंडसोबत हृतिक रोशनची डिनर डेट; सबा आझादचा हात पकडून चालताना दिसला अभिनेता

Hrithik Roshan With Saba Azad: शुक्रवारी हृतिक रोशन त्याची दोन मुलं आणि गर्लफ्रेंड सबा आझादसोबत स्पॉट झाला होता. अभिनेता वीकेंडला डिनर डेटसाठी बाहेर गेला होता.

Hrithik's girlfriend met his sons

1/10
हृतिक रोशन त्याची गर्लफ्रेंड सबा आझादसोबत डिनरला जाताना दिसला. विशेष म्हणजे यावेळी हृतिकची दोन्ही मुलंही त्याच्यासोबत होती.
2/10
म्हणजे हृतिक त्याच्या मुलांना गर्लफ्रेंडशी ओळख करुन देण्यासाठी घेऊन आला होता. यावेळी रेहान आणि हृदान दोघेही खूप शांत दिसत होते आणि शांतपणे ते रेस्टॉरंटकडे जाताना दिसले.
3/10
हृतिकने त्याची गर्लफ्रेंड सबाचा हात धरला होता.
4/10
हृतिकने त्याची गर्लफ्रेंड हिची भेट त्याच्या मुलांशी करुन देण्याचं ठरवलं होतं.
5/10
या स्पेशल डेट नाईटला सबा हृतिकच्या मुलांना भेटायला आली तेव्हा ती फिरोजी स्लिम फिट ड्रेसमध्ये दिसली.
6/10
त्याच वेळी, हृतिक देखील अतिशय सोबर कॅज्युअलमध्ये दिसला. हृतिकने पांढर्‍या टीशर्टसह तपकिरी पँट घातली होती, तर पायात त्याने पांढरे स्नीकर्स घातले होते.
7/10
आई सुझानने रेहान आणि हृदानला खूप सोबर लूकमध्ये पाठवलं होतं. जीन्स आणि टी-शर्ट घालून रेहान आणि हृदान कूल दिसत होते.
8/10
मुलांना भेटायला आलेली सबाही हृतिकच्या कानात काहीतरी कुजबुजताना दिसली.
9/10
या स्पेशल डिनर डेटनंतर हृतिक त्याची दोन मुलं आणि गर्लफ्रेंडसोबत सिनेमा पाहायला गेला होता.
10/10
रिपोर्ट्सनुसार, सबाने आधीच रोशन फॅमिलीसोबत डिनर केलं आहे. हृतिकने याआधीही सबाशी त्याच्या कुटुंबियांची भेट करुन दिली होती.
Sponsored Links by Taboola