बारा वर्षांनी मोठ्या असलेल्या अमृता सिंगसोबत सैफने का केलं लग्न? कशी राहिली लव्ह लाईफ?

saifalikhan and amruta

1/9
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या लव्ह लाइफमध्ये खूपच चढ उतार पहायला मिळाले. 20 व्या वर्षी आपल्यापेक्षा 12 वर्षाने मोठ्या असलेल्या अभिनेत्री अमृता सिंगशी लग्न करून सैफने सर्वांना आश्चर्यचकित केले होते. दोघांचीही लव्ह स्टोरी कोणत्याही चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. चला त्यांच्या मनोरंजक लव्ह स्टोरीकडे पाहूया.
2/9
फोटोशूटच्या निमित्ताने सैफ जेव्हा 'ये दिल्लगी' चित्रपटाच्या सेटवर अमृताला भेटला तेव्हा ती खूप सिनीयर अभिनेत्री होती. फोटोशूट दरम्यान सैफने परवानगीशिवाय अमृताच्या खांद्यावर हात ठेवला, ज्यावर अमृताने त्याच्याकडे रागाने पाहिलं.
3/9
सैफला अमृताची अदा आवडल्याने त्याने तिला रात्रीच्या जेवणासाठी विचारले तर अमृताने नकार दिला.
4/9
त्याऐवजी अमृताने सैफला आपल्या घरी येण्याचे आमंत्रण दिले. दोघांनीही एकत्र वेळ घालवला. हळूहळू दोघांची जवळीक वाढली आणि मग हे प्रकरण लग्नापर्यंत पोहचले.
5/9
अमृता सैफपेक्षा 12 वर्षांनी मोठी होती, त्यामुळे दोघांनाही भीती वाटली की त्यांचे कुटुंब आपले नाते स्वीकारणार नाही. म्हणून त्यांनी 1991 मध्ये कुटूंबाला माहिती न देताच गुपचूप लग्न केले.
6/9
काही वर्षं बरी चालली, पण नंतर त्यांच्यात कुरबुर होत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. यादरम्यान अमृता दोन मुलांची (सारा आणि इब्राहिम) आई झाली होती.
7/9
शेवटी 2004 मध्ये अमृता-सैफने घटस्फोट घेऊन आपले संबंध संपवले.
8/9
घटस्फोटानंतर अमृताला दोन्ही मुलांचा ताबा मिळाला. पोटगी म्हणून सैफने तिला 5 कोटी रुपयेही दिले.
9/9
अमृताशी घटस्फोट घेतल्यानंतर सैफने करीना कपूरशी लग्न केले. आता तो दोन मुलांचा पिताही झाला आहे. त्याचवेळी, अमृताने मुलांचा संगोपन करण्यासाठी वेळ दिला. तिने दुसरे लग्न केले नाही.
Sponsored Links by Taboola