Happy Birthday Honey Singh | हनी सिंग.... बॉलिवूडला खऱ्या अर्थाने रॅप साँगची ओळख करुन देणारा गायक, हनी सिंगच्या नावापुढील 'यो यो' म्हणजे काय?
हनी सिंगचा जन्म 15 मार्च 1883 रोजी पंजाबमधील होशियारपूरमध्ये झाला. हनी सिंगचे खरे नाव हिरदेश सिंह आहे. संगीत क्षेत्रात पदार्पण करताच हिरदेशचे यो यो हनी सिंग या नावाने ओळख निर्माण केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहनी सिंग हा उत्तम गायक, रॅपर, म्युझिक प्रोड्यूसर तर आहेच पण सोबतच तो एक उत्तम अभिनेता आहे. त्यांच्या करिअरच्या सुरूवातीच्या काळात त्याने पंजाबी चित्रपटात अभिनय केला आहे. त्यासाठी त्याने अनेक पुरस्कार देखील मिळाली आहेत.
हनी सिंगला त्याच्या पहिल्याच गाण्यात यश मिळाले होते. त्यानंतर त्याने मेरा दिल, चार बॉटल वोडका, ब्रेकअप पार्टी, ब्लू आईज अशा गाण्यांनी लोकांना वेड लावले. ज्या गायकाने पंजाबी रॅप संगीत हिंदी चित्रपटात आणले तो यो यो हनी सिंग.
2014 साली हनी सिंग अचानक गायब झाला होता. तेव्हा तो दारूच्या, ड्रग्सच्या आहारी गेल्याच्या खूप चर्चा सुरु होत्या. पण 18 महिन्यांनी तो पुन्हा आला तेव्हा त्याने सांगितले की असे काही नसून तो बायपोलर डिसऑर्डर या मानसिक आजाराला बळी पडला होता. त्यामुळे त्या उपचारासाठी तो नोएडा येथील घरी राहत होता.
डोक्यावरील सर्व बाजूंचे केस बारीक ठेवून फक्त मधला पट्टा झुपकेदार पिसांसारखी ठेवणारी तरुण मुलं सहज दिसून येतात. गायक हनी सिंग याच्या नावाने ही स्टाइल फेमस आहे. यो यो हनी सिंग असे या स्टाइलचे नाव आहे. वाऱ्याबरोबर केसांचे हे डोलदारे झुपके पाहणाऱ्यांनाही वेगळेपणाचा भास देतात.
हनी सिंगचा 'मिर्जा-द अनटोल्ड स्टोरी' या पंजाबी चित्रपटापासून अभिनय प्रवास सुरू झाला. या चित्रपटातील अभिनयासाठी त्याला अॅवॉर्ड देखील मिळाले होते. त्यानंतर त्यांनी 'तू मेरा 22 मैं तेरा 22' या चित्रपटात काम केले. या चित्रपटात हनी सिंगने विनोदी पात्र साकारले होते.
'वॉर ऑफ डीजे' या दिल्लीत झालेल्या कॉन्टेस्ट मध्ये हनी सिंगने दुसरा क्रमांक मिळवला होता, तोच त्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. तिथूनच त्याच्या करिअरची खरी सुरूवात झाली. हनी सिंग त्याच्या नावापुढे 'यो यो' लावतो. ज्याचा अर्थ 'तुमच्यातला तुमचा' असा होतो. म्हणजेच त्याच्या पूर्ण नावाचा अर्थ 'तुमच्यातला तुमचा हनिसिंग' असा होतो.
हनी सिंग लोकप्रिय गायक असूनही त्यांना इंग्रजी भाषेत गायला आवडत नाही. त्यांना पंजाबी भाषेतील गाणी जास्त प्रिय आहेत. त्यांनी शाहरूख, सैफ, ऋतिक सारख्या सुपरस्टारसाठी गाणी गायली आहेत. हनी सिंगचे चाहते फक्त भारतापुरतेच मर्यादित नसून जगभर पसरलेले आहेत.