Hemangi Kavi: हेमांगी कवीनं शेअर केले मुंबईच्या 'रॉयल ऑपेरा हाऊस'मधील खास फोटो; म्हणाली, 'सगळा रॉयल कारभार...'
हेमांगीच्या ‘जन्मवारी’ या नाटकाचे प्रयोग विविध ठिकाणी होत आहेत. नुकताच या नाटकाचा प्रयोग मुंबईच्या रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहेमांगीनं रॉयल ऑपेरा हाऊसमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंनी अनेकांचे लक्ष वेधले आहे.
रॉयल ऑपेरा हाऊसमधील फोटो शेअर करुन हेमांगीनं कॅप्शनमध्ये लिहिलं, खरंतर भक्ताला कुठलंही देऊळ सारखंच! इतर अनेक ठिकाणी त्याने विठ्ठलाची मूर्ती पाहीलेली असली तरीही ‘आयुष्यात एकदा तरी पंढरपूरला जाऊन दर्शन घ्यावं’ ही इच्छा तो मनी बाळगतोच! तसंच माझंही होतं. मला कुठल्याही नाट्यगृहात प्रयोग करायला आवडतंच पण ‘साला एकदा तरी या रॅायल ॲापेरा मध्ये प्रयोग करायचाय यार’ ही अनेक वर्षांपासूनची इच्छा होती!आणि…काल मुंबईच्या रॅायल ॲापेरा हाऊस मध्ये आमच्या ‘जन्मवारी’ नाटकाचा रॅायल प्रयोग झाल्यामुळे माझी ही पण इच्छा पूर्ण झाली!'
पुढे हेमांगीनं पोस्टमध्ये लिहिलं,'खरंच नावाप्रमाणे सगळा रॉयल कारभार. नाट्यगृहाचं interior, lights, decorum, greenrooms, त्यातलं furniture, स्वच्छता, corridors, रंगसंगती, sound system, भव्य दिव्यपणा! आहाहा! क्या बात है. सगळंच विलक्षण! एखाद्या राजमहालात आलोय की काय असंच वाटत होतं! इतक्या वर्षांपासून फक्त इतरांकडून या वास्तूचं कौतुक ऐकत आलेय, कुणाकुणाच्या photos मध्ये पाहत आलेय पण काल मी चक्कं त्या वास्तूमध्ये उभं राहून प्रयोग सादर केला!'
'अनेक वेळा मी या नाट्यगृहाला बाहेरून बघितलंय पण कायमच ‘आतून हे कसं असेल’ याचं कुतूहल वाटत आलंय. म्हणजे रीतसर तिकीट काढून प्रेक्षक म्हणून नाट्यगृह नक्कीच बघता आलं असतं पण आपन ठहरे कलाकार!!! “आत पाऊल ठेवेन ते माझ्या नाटकाचा प्रयोग करायलाच”!!! या खुळ्या निग्रहामुळे खूप वर्ष वाट पाहावी लागली खरंतर मला पण ते वाट पाहणं worth होतं असंच वाटलं!' असंही हेमांगीनं पोस्टमध्ये लिहिलं.
हेमांगीनं पोस्टमध्ये लिहिलं, 'अनेक दिवस वारीत चालून झाल्यावर जेव्हा पंढरपूरात पाऊल पडतं तेव्हा जे त्या भक्ताचं होत असेल तेच माझं ही झालं! धन्य धन्य! माझा हा निग्रह पुर्ण करण्याची आणि प्रयोग सादर करण्याची संधी मिळाली ते ‘नाट्यधारा’ नाट्यमहोत्सवामुळे. संपूर्ण भारतातून काही नाटकांची निवड केली होती त्यात ‘जन्मवारी’ नाटक निवडल्याबद्दल नाट्यधारा निवडसमीतीचे आणि अनेक वर्षांपासून रंगभूमीची ज्या मनापासून जोपासना करताएत असे आमचे Ravi Mishra sir यांचे खूप खूप धन्यवाद!'
हेमांगीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये ती ब्लू स्कर्ट, व्हाईट शर्ट अशा लूकमध्ये 'रॉयल ऑपेरा हाऊस'मध्ये उभी असलेली दिसत आहे.
हेमांगीनं शेअर केलेल्या फोटोवर एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'हेमांगी किती छान लिहिलं आहेस, तू जशी आवडतेस, तुझ्या reels, तुझा attire आवडतो तसचं तुझे लिखाणही आवडतं'