PHOTO : बॉलिवूडच्या ‘देसी गर्ल’चा हॉलिवूडमध्येही डंका! जाणून घ्या अभिनेत्रीबद्दलच्या खास गोष्टी...
बॉलिवूडची लाडकी ‘देसी गर्ल’ आज 40 वर्षांची झाली आहे. आज (18 जुलै) प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) तिचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. बरेलीतून बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी प्रियांका चोप्रा आता एक ग्लोबल स्टार बनली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएका छोट्या गावातून आलेल्या या मुलीने स्वतःसाठी मनोरंजन विश्वात स्वतःचे हक्काचे स्थान तयार केले आहे. या दरम्यान तिला देखील प्रचंड संघर्ष करावा लागला होता.
प्रियांका चोप्राचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. तिचे बालपण जमशेदपूरमध्ये गेले. मनोरंजन विश्वात प्रियांका चोप्राने अतिशय मेहनतीने हे स्थान मिळवले आहे. यामागचा तिचा प्रवास खूप रंजक होता.
प्रियांकाचे वडील आर्मी ऑफिसर होते, त्यामुळे तिला अनेकदा शाळा बदलावी लागल होती. जमशेदपूरपूर्वी प्रियांका चोप्राचे बालपण बरेलीमध्ये गेले. वयाच्या 13व्या वर्षी प्रियांका अमेरिकेला गेली आणि तिथे ती तिच्या मावशीकडे राहू लागली.
प्रियांकाने अमेरिकेत जवळपास तीन वर्षे घालवली आणि ती पुन्हा भारतात परत आली. प्रियांका चोप्रा अचानक प्रसिद्धीच्या झोतात आली, जेव्हा तिने 2000 मध्ये ‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकला. प्रियांकाला करिअर म्हणून अभिनय क्षेत्र निवडायचे नव्हते. तिला इंजिनियर व्हायचे होते किंवा मानसशास्त्राचा अभ्यास करायचा होता.
पण, 2000 साली ‘मिस वर्ल्ड’ बनल्यानंतर प्रियांकाने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा विचार सुरू केला. 2002मध्ये प्रियांका 'हमराज' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. पण, तिच्या जागी अमिषा पटेलला कास्ट करण्यात आले. तिने 2003 मध्ये सनी देओलसोबत 'द हीरो' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
यानंतर तिने सलग हिट चित्रपट द्यायला सुरुवात केली. 'दोस्ताना' चित्रपटातून प्रियंका चोप्राला ‘देसी गर्ल’चा टॅग मिळाला होता. यानंतर प्रियांका चोप्राला हॉलिवूडमधून ऑफर आली. हॉलिवूडमध्ये तिने 'क्वांटिको' आणि 'बेवॉच'सारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले. (Photo : @Priyanka Chopra/IG)