Happy Birthday Bobby Deol : नाईट क्लबमध्ये डीजे म्हणून काम केले, ‘बाबा निराला’ने पुन्हा एकदा दिली बॉबी देओलच्या करिअरला झळाळी!
Bobby_Deol_6
1/6
बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांच्या घरी 27 जानेवारी 1969 रोजी बॉबी देओलचा (Bobby Deol) जन्म झाला. बॉबी पहिल्यांदा 'धरमवीर' या चित्रपटात बाल कलाकार म्हणून दिसला होता. (PC : iambobbydeol/IG)
2/6
मुख्य अभिनेता म्हणून त्याचा पहिला चित्रपट 'बरसात' होता, जो 1995 मध्ये रिलीज झाला होता. बॉबीला 'बरसात'साठी फिल्मफेअर बेस्ट मेल डेब्यू अवॉर्ड मिळाला. (PC : iambobbydeol/IG)
3/6
बॉबीने आपल्या करिअरमध्ये 'बरसात', 'सोल्जर', 'बादल', 'बिच्छू', 'अजनबी' सारखे चित्रपट केले आहेत. 'हमराज'साठी बॉबीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. मात्र, काही वर्षांनी त्यांना काम मिळणे बंद झाले. बॉबीने करिअर सुरू केल्यानंतर एका वर्षातच तान्याशी लग्न केले. (PC : iambobbydeol/IG)
4/6
बॉबीच्या आयुष्यात एक असा टप्पा आला, जेव्हा त्याच्याकडे दहा वर्षे काम नव्हते. त्याकाळात सलमानने निराशेच्या गर्तेत असलेल्या बॉबीला ‘रेस 3’मध्ये ब्रेक दिला. एका मुलाखतीत बॉबी देओल म्हणाला होता की, मी हरलो होतो, पण माझ्या कुटुंबाने माझी साथ सोडली नाही. (PC : iambobbydeol/IG)
5/6
परंतु, एवढ्या वर्षांत बॉबी कधीही कोणाकडे काम मागायला गेला नाही. 2016 मध्ये बॉबी दिल्लीच्या नाईट क्लबमध्ये डीजे बनला होता. (PC : iambobbydeol/IG)
6/6
मात्र, ‘आश्रम’ या वेब सीरिजने त्याच्या करिअरला गती दिली. यामध्ये त्याने आध्यात्मिक बाबा निरालाची भूमिका साकारली होती. या भूमिकेने बॉबीच्या करिअरला पुन्हा एकदा झळाळी दिली आहे. (PC : iambobbydeol/IG)
Published at : 27 Jan 2022 01:38 PM (IST)