Photo : बालकलाकार म्हणून मनोरंजन विश्वात पदार्पण, अनेकदा अपयश पचवूनही स्वतःला सिद्ध करणाऱ्या आशा पारेख!
60 आणि 70 च्या दशकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या नावाची जेव्हा चर्चा होते, तेव्हा त्यात आशा पारेख यांचे नाव नक्कीच येते. त्या काळात आशा पारेख यांनी चित्रपट विश्वावर राज्य केले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यांनी आपल्या बबली स्टाईलने आणि ग्लॅमरस अवताराने त्या काळात चाहत्यांची मनं जिंकली. आशा पारेख यांनाही त्यांच्या आयुष्यात संघर्ष करावा लागला होता. चित्रपट विश्वात अनेक नकारांना तोंड देऊनही त्यांनी कधीही हार मानली नाही.
आशा पारेख यांनी वयाची 80 वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1942 रोजी गुजरातमध्ये झाला. गुजराती कुटुंबात जन्मलेल्या आशा पारेख यांची आई मुस्लिम आणि वडील गुजराती होते.
60-70 च्या दशकात आशा पारेख केवळ त्यांच्या चित्रपटांसाठीच नाही, तर त्यांच्या मजबूत मानधनासाठी देखील ओळखल्या जात होत्या. आशा पारेख त्या दशकात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होत्या.
आशा पारेख यांनी बालकलाकार म्हणून चित्रपट विश्वात प्रवेश केला. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण त्यांचे काही चित्रपट फ्लॉप झाले.
पण तरीही त्यांनी हार मानली नाही आणि वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून मनोरंजन विश्वात पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला.
सततच्या अपयशानंतर आशा पारेख यांचा ‘दिल देके देखो’ हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
अनेक वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम करून आपले वेगळे स्थान निर्माण केले. नुकताच त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. (Photo : @ ashaparekhofficial/Ig)