PHOTO : अवघ्या विश्वाला आपल्या सौंदर्याने मोहित करणाऱ्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा!
दर वर्षी माणसाचं वय वर्षाने वाढत जातं. पण रेखा यांच्या बाबतीत मात्र वयाने माघार घेतली असावी असं म्हटलं तर, वावगं ठरणार नाही.
Rekha
1/9
आपल्या अभिनयाने, अदाकारीने आणि सौंदर्याने रसिक प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांचा आज वाढदिवस आहे.
2/9
दर वर्षी माणसाचं वय वर्षाने वाढत जातं. पण रेखा यांच्या बाबतीत मात्र वयाने माघार घेतली असावी असं म्हटलं तर, वावगं ठरणार नाही.
3/9
सरत्या वर्षांनी त्यांच्या वयात नव्हे तर सौंदर्यात आणखी भर घातली. आजघडीला त्या ज्या यशाच्या आणि प्रसिद्धीच्या शिखरावर आहेत, तिथपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा मार्ग अतिशय खडतर होता.
4/9
हिंदी चित्रपटसृष्टीतल्या प्रतिभावान अभिनेत्रींमध्ये रेखा यांचे नाव अग्रक्रमी घेतले जाते. वयाच्या 68व्या वर्षीही ही सौंदर्यवान अभिनेत्री आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत आहे. चित्रपटसृष्टीत सफल ठरलेल्या रेखा यांचे वैयक्तिक आयुष्य मात्र अतिशय कष्टप्रद होते.
5/9
अभिनेत्री रेखा यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1954 रोजी चेन्नईमध्ये झाला. त्यांचे पूर्ण नाव भानूरेखा गणेशन. रेखा यांचे वडील ‘जेमिनी गणेशन’ हे तमिळ अभिनेते तर, आई ‘पुष्पवल्ली’ प्रसिद्ध तेलुगु अभिनेत्री होत्या.
6/9
घरची पार्श्वभूमी अभिनयाची असली, तरी रेखा यांना अभिनयात अजिबात रस नव्हता. चेन्नईमध्ये त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. सहा बहिणी, एक भाऊ असे मोठे कुटुंब असणाऱ्या रेखा यांच्या घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची होती.
7/9
कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यासाठी रेखा यांना शिक्षण सोडून अर्थार्जनासाठी अभिनय क्षेत्राकडे वळायला लागले.वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी ‘रंगुला रत्नम’ या तेलुगु चित्रपटात बालकलाकाराची भूमिका सकारात त्यांनी आपला अभिनयाचा प्रवास सुरु केला,
8/9
1960मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सावन भादों’ या चित्रपटाने रेखा यांचे जीवन बदलले. या चित्रपटाने रेखा यांना हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख मिळवून दिली.
9/9
आपल्या 40 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास 180हून अधिक चित्रपटांत काम केले. ‘उमराव जान’, ‘खूबसूरत’, ‘सिलसिला’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘खून भरी मांग’, ‘खिलाड़ियों का खिलाड़ी’ हे त्यांचे चित्रपट विशेष गाजले. (Photo : @Instgram)
Published at : 10 Oct 2022 08:57 AM (IST)